पुणे - गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार पहायला मिळाला. राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपात गेले. दरम्यान आज पुण्यात बोलतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले, मागच्या वेळी त्यांनी फोडाफोडी केली. इतर पक्षातून जेव्हा आमदार घेत होते. तेव्हा त्यांना उकळ्या फुटत होत्या. आता तेच नेते आमच्याकडे येऊ शकतात म्हटलं तर, त्यांना राग आला. आता कसं वाटतंय तर गार गार वाटतंय, असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या ‘सीएसआर’ (सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडातून ‘कोविड-१९’च्या लढाईसाठी केलेल्या कामांचे उद्घाटन तसेच विविध उपकरणांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. विधान भवनाच्या (कौन्सिल हॉल) सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
नियोजनबद्ध विकास व्हावा म्हणून 23 गावांचा समावेश-बरेच दिवस झाले गांव घ्यायची आहे, हे चाललं होत. अनेक लोकप्रतिनिधींच ही म्हणणं होत. खरोखरच ही गांव घेण्याची गरज आहे. 23 गावांचा समावेश पालिका क्षेत्रात केला तर नियोजनबद्ध विकास होईल. तसेच समाविष्ट गावा बाबतचा हा निर्णय पालिका निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून घेण्यात आलेला नाही.पालिका निवडणुका 2022 ला आहे आत्ता 2020 आहे अस ही यावेळी अजित पवार म्हणाले.
जर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला आहे तर शेतकरी रस्त्यावर का आहे-दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत अजित पवार यांनी भाष्य केलं. जर केंद्र सरकारने कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले आहेत. तर शेतकरी रस्त्यावर का उतरले. शेतकरी एवढया कडाक्याच्या थंडीत का बसले आहेत, याचही आत्मचिंतन सरकाने करावं. इथं बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा तिथं आंदोलक शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे, अशी टिकाही अजित पवार यांनी केली.
हेही वाचा- परत कोल्हापूरला जायचं होतं तर पुण्यात आलात कशाला? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला