पुणे - पुण्यातील धानोरी येथे काल महापालिकेच्यावतीने अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आज पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. धानोरी परिसरामध्ये काल चार जेसीबीने ही कारवाई सुरू होती. मात्र आज पंचवीस जेसीबी महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण हटवण्यासाठी लावण्यात आलेत पुण्यातील धानोरी परिसरात अतिक्रमण हटवल जात आहे.
पथकावर दगडफेक - काल धानोरी येथे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. तसेच कारवाईसाठी आलेल्या जेसीबीवर दगडफेक सुद्धा काल करण्यात आली होती.पण आज महापालिका अधिकाऱ्यांच्यावतीने जोरदार कारवाईला सुरवात झाली आहे.महापालिकेत प्रशासक राज्य आल्यापासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून शहरातील अतिक्रमण हटवण्याचे काम केले जात आहे.