ETV Bharat / city

उपमुख्यमंत्र्यांनी फक्त फित कापली; रुग्णांसाठी 'डेडीकेटेड जम्बो कोव्हिड केअर सेंटर' अद्यापही बंदच - डेडीकेटेड जम्बो कोविड केअर सेंटर

मुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 6 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेलं बाणेर येथील डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर अद्यापही सुरू झालं नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनंतर राज्य सरकार आणि महानगरपालिका पुणेकरांच्या जीवाशी कसा खेळ करत आहे, याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

covid care center in pune
उपमुख्यमंत्र्यांनी सहा दिवसांपूर्वी उद्घाटन केलेलं 'डेडीकेटेड जम्बो कोविड केअर सेंटर' रुग्णांसाठी अद्यापही बंदच
author img

By

Published : Sep 3, 2020, 6:58 AM IST

पुणे - जम्बो कोविड रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची घटना ताजी असतानाच आता असाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 6 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेलं बाणेर येथील डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर अद्यापही सुरू झालं नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनंतर राज्य सरकार आणि महानगरपालिका पुणेकरांच्या जीवाशी कसा खेळ करत आहे, याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

covid care center in pune
ख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सहा दिवसांपूर्वी बाणेरमध्ये कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
मोठा गाजावाजा करत 28 ऑगस्टला या डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर हे रुग्णालय दोन दिवसांत सुरू होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. तसेच हे रुग्णालय म्हणजे आतापर्यंत पुण्यातील सर्वोत्तम रुग्णालय असल्याचं प्रशस्तीपत्रक पवारांनी दिलं. परंतु त्यांचा हा दावा फोल ठरलाय. उद्घाटनानंतर सहावा दिवस उजाडला तरीही हे रुग्णालय अजूनही सुरू झाले नाही.
covid care center in pune
मात्र बाणेरमधील कोविड केअर सेंटर अद्यापही सुरू झालं नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केल्यानंतर त्यांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले. तसेच उद्यापासून डॉक्टर उपलब्ध होतील आणि नंतर हे रुग्णालय चालू करण्यात येईल असेही सांगण्यात आले. पुण्याच्या बाणेर-बालेवाडी परिसरात सीएसआरच्या माध्यमातून हे सहा मजली कोव्हिड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये 270 ऑक्सिजन आणि 44 व्हेंटिलेटर बेड्स असे एकूण 314 बेड्सची व्यवस्था आहे. ऑक्सिजन कमी पडू नये, म्हणून 13 हजार लिटर क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. तसेच बॅकअपसाठी 16 बाय 16 ऑक्सिजन सिलिंडर, मॅनिफोल्ड, त्यासाठी शेड तसेच कॉम्प्रेसर व व्हॅक्युम पंप याची व्यवस्था केलेली आहे. वीजेच्या बॅकअपसाठी आयसीयु युपीएस व जनरेटर सुविधा करण्यात आली आहे. मात्र, रुग्णालय सुरू न झाल्याने आता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.