पुणे दहीहंडी गोपाळकाला पुरुषाचे वर्चस्व असलेला उत्सव. पण यामध्ये सुद्धा महिला सुद्धा मागे नाही कारण राज्यातील पहिली दहीहंडी ही पुण्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. 2011 साली या दहीहंडीला सुरुवात झाली. पुण्यातील कोथरूड भागांमध्ये Kothrud Women Dahi Handi Festival जीत मैदानावर हा महिलांची दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. यात विशेष म्हणजे या पुरुषांचा सहभाग हा फक्त सुरक्षा पुरता मर्यादित असतो. दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने या उत्सवांमध्ये जे व्यवस्थापक आहेत, त्यांना एक ड्रेस कोड दिला जातो आणि त्या ड्रेस कोडमध्ये त्यांना आतमध्ये प्रवेश असतो. त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही पुरुषाला तिथे प्रवेश दिला जात नाही. संपूर्ण महिलांना या उत्सवाचा आनंद घेतात.
कोरोनाच्या निर्बंधानंतर प्रथमच निर्बंध मुक्त दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे सगळेच उत्सव मोठ्या जल्लोषांमध्ये साजरे करण्यात येत आहेत. यात महिलांची दहीहंडी सुद्धा आहे. हा उत्सव यावर्षी मोठ्या उत्सवामध्ये साजरा करणार असल्याचे मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत. मुंबईवरून दहीहंडी फोडण्यासाठी एक पथक दाखल होतो. गोपिका पथक असे या पथकाचे नाव. हा पथक दरवर्षी कोथरूड भागातील महिला दहीहंडी सहभागी होतात. या उत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांनाही आनंद घेता यावा, तसेच महिला दहीहंडी संकल्पना पुढे यावी यासाठी या मंडळाची निर्मिती करण्यात आल्याचे पदाधिकारी सांगतात.
हेही वाचा - Dahi Handi festival भाजपकडून मुंबई महापालिका टार्गेट, तब्बल ३७० ठिकाणी दहीहंडीचे केले आयोजन