पुणे : 'कोविशिल्ड' या कोरोना लसीचा पुरवठा करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे Serum Institute, Pune प्रमुख आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हाट्सऍप मेसेज करून एक कोटींचा गंडा Aadar Poonawala one crore fraud घालण्यात आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल case registered in Bundagarden police station करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. ज्या बँकेत पैसे ट्रान्स्फर झाले आहे त्यात ते वेस्ट बंगाल, बिहार, ओडिसा, केरळ, मध्यप्रदेश अश्या राज्यातील बँकांमध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यात आले आहे.
काय आहे प्रकार - सिरम इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आदर पूनावाला Aadar Poonawala, CEO of Serum Institute यांच्या मोबाईल नंबरवरून बनावट व्हाट्सअप मेसेज पाठवून विविध अकाउंटला पैसे पाठविण्यास सांगत 1 कोटी 1 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी 419, 420, 34, यासह आयटी ॲक्ट 66 सी आणि डी या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडला. याप्रकरणी सागर शशिकांत कित्तूर (वय 44, रा. नताशा इन्क्लेव्ह, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
विविध बँक खात्यावर टाकल पैसे - आदर पूनावाला हे सीरम कंपनीचे सीईओ पदावर काम करतात. तर कंपनीच्या संचालक पदावर सतीश देशपांडे आहेत. देशपांडे यांच्या मोबाईलवर कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांच्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअप मेसेज आला. त्या मेसेजमध्ये काही बँक खाती नंबर देण्यात आलेली होती. या नंबरवर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगण्यात आले होते. कंपनीचे मालक आदर पूनावाला यांचा मेसेज आल्याने त्यांनी तातडीने पैसे भरण्यास सांगितल्याने देशपांडे यांनी याबाबतची माहिती सागर कित्तूर यांना दिली. त्यानंतर कित्तुर यांनी बनावट मेसेजद्वारे आलेल्या विविध बँक खात्यावर एक कोटी एक लाख एक हजार रुपये भरले. याबाबत कित्तुर यांनी कंपनीत चर्चा केल्यानंतर, त्यांना आदर पुनावाला यांनी अशाप्रकारे विविध बँक खात्यावर पैसे भरण्यास कोणत्याही मेसेज केलेला नव्हता ही बाब उघडकीस आली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. ज्या बँकेत पैसे ट्रान्स्फर झाले आहे त्यात ते वेस्ट बंगाल, बिहार, ओडिसा, केरळ, मध्यप्रदेश अश्या राज्यातील बँकांमध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यात आले आहे. यात आयसीसीआय, एचडीएफसी, एसबीआय, आयडीएफसीमध्ये पैसे गेले आहे अशी, माहिती बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी यावेळी दिली.