पुणे - पिंपरी-चिंचवड अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरातून वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन ड्रग्स पकडले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. संबंधित टोळीचे मुंबईमधील बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. तर, नोएडा येथे राहणारे पाच पैकी दोन आरोपी हे विमानाने पुण्यात आले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मेफेड्रोन ड्रग्सप्रकरणी अटक आरोपींच्या बॉलिवूड कनेक्शनची शक्यता - पोलीस आयुक्त - मेफेड्रोन ड्रग्स अटक आरोपी बॉलिवूड कनेक्शन बातमी
चाकण परिसरातील शिरूर - चाकण मार्गावरून अज्ञात मोटारीने काही व्यक्ती मेफेड्रोन ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, संबंधित ठिकाणी सापळा लावण्यात आला. परंतु आरोपी यांनी मोटार थांबवली नाही. त्यांचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला आणि शेल पिंपळगाव येथे त्यांना पकडले, पाच ही आरोपीकडे असलेल्या बॅगेत 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन ड्रग्स आढळले. संबंधित कारवाईमध्ये आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.