ETV Bharat / city

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतमोजणीला 36 तास लागण्याची शक्यता - पुणे शिक्षक मतदारसंघ

पुण्यातल्या बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. पदवीधरसाठी 126 पर्यवेक्षक, 252 सहायक व 126 शिपाई आणि शिक्षक मतदारसंघासाठी 42 पर्यवेक्षक 84 सहायक आणि 42 शिपायांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तर, पदवीधरसाठी (राखीवसह) एकूण 855 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 305 अधिकारी-कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत.

counting
मतदान
author img

By

Published : Dec 3, 2020, 7:02 AM IST

पुणे - पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज 3 डिसेंबरला होणार आहे. जिल्हा प्रशासनाची मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. पुण्यातल्या बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे.

किती कर्मचाऱ्यांची यंत्रणा -

मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी 18 हॉल तर शिक्षक मतदार संघासाठी 6 हॉल आहेत. त्‍यानुसार स्‍वतंत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, रो (रांग) अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक हॉलमध्‍ये 7 टेबल असतील. त्‍याप्रमाणे पदवीधरसाठी 126 पर्यवेक्षक, 252 सहायक व 126 शिपाई आणि शिक्षक मतदारसंघासाठी 42 पर्यवेक्षक 84 सहायक आणि 42 शिपायांची नियुक्‍ती करण्‍यात आलेले आहेत. पदवीधरसाठी (राखीवसह) एकूण 855 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 305 अधिकारी-कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. सुरक्षेसाठी 450 पोलीस अधिकारी-कर्मचारी उपलब्‍ध असणार आहेत.

मतमोजणीला वेळ लागण्याची शक्यता -

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्‍या पाहता मतमोजणीला 36 तासांहून अधिक कालावधी लागू शकतो. या सर्व बाबी लक्षात घेवून प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. मतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. पुणे विभागात पदवीधर मतदार संघातल्या पाच जिल्ह्यात
2 लाख 47 हजार 50 इतके मतदान झाले असून एकूण मतदानाच्या 57.96 टक्के मतदान झाले आहे. तर शिक्षक मतदारसंघात 52 हजार 987 मतदान झाले, एकूण मतदानाच्या 73.04 टक्के मतदान झाले आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेच्‍या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघाच्‍या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत.

हेही वाचा - नागपूर : सायलक स्वारी करून मनपा कर्मचाऱ्यांनी पाळला 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस'

हेही वाचा -सरकारचा मोठा निर्णय; सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.