ETV Bharat / city

पुण्यात कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार - शिक्षकाने केला विद्यार्थीनीवर बलात्कार

मोसिन शेख (वय 32) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune crime
कोंढवा पोलीस
author img

By

Published : Jul 14, 2020, 12:56 AM IST

पुणे - करिअर मार्गदर्शन करणाऱ्या एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला मित्राच्या फ्लॅटवर घेऊन जात तिच्यासोबत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढव्यातील एका सोसायटीत दहा जुलै रोजी ही घटना घडली. मोसिन शेख (वय 32) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. तिचा निकाल येणे अद्याप बाकी आहे. मोसिन शेख हा ऑक्टोबर 2019 मध्ये पीडित तरुणीच्या विद्यालयात करिअर गाईडलाईन्स यावर लेक्चर देण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याची पीडित तरुणीसोबत ओळख झाली होती. तेव्हा त्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतःचा मोबाईल नंबर दिला होता. पीडित तरुणीला मर्चंट नेव्हीचा कोर्स करायचा होता. यासाठी तिने चार जुलै रोजी मोसिन शेख यांच्याशी फोनवर संपर्क साधला. तेव्हा त्याने या तरुणीला कौसर बागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले.

पीडित तरुणी आईला घेऊन त्या ठिकाणी गेली. क्लासची माहिती घेतली. परंतु पैसे भरू शकत नसल्यामुळे तिने क्लासला जाणे टाळले. पीडित तरुणी क्लासला न आल्याने आरोपीने तिच्याशी संपर्क साधला आणि तुझ्या फीच्या पैशाचे मी पाहतो असे सांगत तिला बोलावून घेतले आणि कारमध्ये बसवून मित्राच्या फ्लॅटवर नेले. तेथे त्याने या तरुणीवर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नये यासाठी त्याने तिला धमकावले.

पीडित तरुणीने दुसऱ्या दिवशी आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. दरम्यान, आपल्या विरोधात तक्रार दिल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला असून, कोंढवा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.