ETV Bharat / city

वातावरण बदलाचा कांदा पिकावर परिणाम; वेळीच उपाययोजना करण्याचा कृषीतज्ज्ञांचा सल्ला - रब्बी हंगाम

कांद्याच्या तुटवड्यामुळे कांद्याचे बाजारभाव गगणाला भिडले आहेत. त्यात रब्बी हंगामात कांद्याचे चांगले उत्पादन मिळुन हातात दोन पैसे येतील, या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. मात्र, सध्या हाच कांदा आजारी पडला आहे.

Climate change impacts onion crops
वातावरण बदलाचा कांदा पिकावर परिणाम
author img

By

Published : Dec 27, 2019, 2:35 PM IST

Updated : Dec 28, 2019, 2:33 PM IST

पुणे - निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. सकाळी दाट धुके, कडाक्याची थंडी, दिवसा ऊन-पाऊस असे वातावरण होत असल्याने, रब्बी हंगामातील कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंत्तेत आहे. या परिस्थितीत आलेल्या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत ईटीव्ही भारतने कृषी तज्ज्ञांशी चर्चा केली आहे.

वातावरण बदलाचा कांदा पिकावर परिणाम; वेळीच उपाययोजना करण्याचा कृषीतज्ज्ञांचा सल्ला

हेही वाचा... 'यापुढे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर अभिषेक नाही,' विश्वस्त समितीच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध

वातावरणातील लहरीपणाचा सर्वाधिक फटका, हा कांदा पिकाला बसत आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांद्याची लागवड केली. परंतु हाच कांदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्यासोबत रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांवर देखील तांबेरा, मावा, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे, असे जयसिंग गोडसे या शेतकऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा... एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलीस 'एफबीआय'ची मदत घेण्याची शक्यता

सध्या कांदा पिकाला करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या भांडवली खर्चातून उभारलेल्या कांद्याचे रोगराईमुळे उत्पादन घटून शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. तेव्हा या सर्व परिस्थितीवर वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञ विश्वास डोळस यांनी दिला आहे.

हेही वाचा... अल्पवयीन मुलीवर बसमध्ये अत्याचार, दोघांना अटक

उत्पादनातील होणारी घट व संभाव्य नुकसान यांपासून पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी योग्य पध्दतीने घेणे आवश्यक आहे. तसेच वेळच्या वेळी पिकांवर औषध फवारणी करून जैविक-सेंद्रिय खतांचा वापर कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने करावा. महत्वाचे म्हणजे पिकांच्या मुळवाढीकडे लक्ष द्यावे, असे कृषीतज्ञ डोळस यांनी सांगितले आहे.

हेही वाचा... कायद्याचे रक्षकच बनले भक्षक, नवी मुंबईतील मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्याच्या पोलीस महानिरीक्षकावर गुन्हा दाखल

Intro:Anc_निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय सकाळी दाट धुक्यात गुलाबी थंडी,दिवसा ऊन पाऊस असं वातावरण तयार होत असल्याने उन्हाळा पाऊसाळा हिवाळा असे तीनही ऋतू एकत्र येऊन रब्बी हंगामातील कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकरी चिंत्तेत आलाय...या संकटावर कशी मात कराल एक स्पेशल रिपोर्ट...

Vo_कांद्याच्या तुटवड्यामुळे बाजारभाव गगणाला भिडलेत त्यातून रब्बी हंगामातील कांद्याचे चांगले उत्पादन मिळुन हातात दोन पैसे येतील या आशेने शेतक-याला कांद्याच्या रुपातुन सोन्याचा बाजारभाव मिळेल या आशेने शेतात राबराब राबतोय मात्र सध्या हाच कांदा आजारी पडलाय त्यामुळे शेतकरी चिंत्तेत आहे

Byte:जयसिंग गोडसे(शेतकरी)

Vo__वातावरणातील या लहरीपनाचा सर्वाधिक फटका हा कांदा पिकाला बसणार असून सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांद्याची लागवड केली.परंतु आता हाच कांदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटात सापडला असून कांद्यासोबत रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी यांसारख्या पिकांवर ही तांबेरा मावा करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

Byte:विश्वास डोळस(कृषीतज्ञ)

Vo__सध्याच्या रोगराई मुळे कांद्याला करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे मोठ्या भांडवली खर्चातुन उभारलेल्या कांद्याचे रोगराई मुळे उत्पादन घटुन शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागू शकतो त्यामुळे रोगराई वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे..

Byte:विश्वास डोळस(कृषीतज्ञ)

Vo__उत्पादनातील घट व होणारे नुकसान यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी योग्य पध्दतीने घ्यावी आणि वेळच्या वेळी पिकांवरती फवारणी करूण जैविक सेंद्रिय खतांचा वापर कृषी सल्ल्याने करावा आणि पिकांच्या मुळवाढी कडे लक्ष्य द्यावे असे कृषी तज्ञांनी सांगितले आहेत.

Byte:विश्वास डोळस(कृषीतज्ञ)

End Vo__सततच्या अस्मानी संकटानी पिडलेल्या बळीराजा शेतकऱ्याच्या चिंता या काही केल्या कमी होताना दिसत नसून निसर्गाच्या लहरी पनामुळे मायबाप शेतकरी हा पुरता हतबल झाला आहे.Body:कृषी सल्ला स्पेशल पँकेज करावे...Conclusion:
Last Updated : Dec 28, 2019, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.