पुणे - नदी स्वच्छतेसाठी वी पुणेकर फाउंडेशन तर्फे 'माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमाची व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशी म्हणजेच आज सांगता झाली. या उपक्रमांतर्गत ओंकारेश्वर, वृद्धेश्वर, गरवारे, खडकवासला, वारजे, एस.एम. जोशी या सर्व घाटांवर स्वछता अभियान राबविण्यात आले. भिडे ब्रिज येथे या उपक्रमाची सांगता झाली.
हेही वाचा - निवडणुका असलेल्या राज्यात महाराष्ट्राच्या खतांचा साठा केंद्राने वळवला- कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचा आरोप
या उपक्रमाला अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच, स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 'माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन' हा उपक्रम राबवून नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्राधान्य देणार, असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. या कार्यक्रमाला वी पुणेकर संस्थेचे अध्यक्ष पराग मते, भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे उपाध्यक्ष अनिल मते, राज देशमुख, पुणे विद्यापीठाचे सदस्य राजेश पांडे व पुणे महानगरपालिका हेल्थ असिस्टंट ऑफिसर डॉ. केतकी घाटगे व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
हेही वाचा - VIDEO : 36 व्या वर्षी दहावी पास झालेली महिला झाली शिक्षिका; पुण्याच्या महिलेचा जिद्दीचा प्रत्यय