ETV Bharat / city

दगडूशेठ गणपतीला दान केलेले दीड किलो सोन्याचे दागिने सीआयडी कडून जप्त - महेश मोतेवार बातमी

समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या आमिषाने देशभरातील गुंतवणुकदारांना तब्बल २ हजार ५१२ कोटींचा गंडा घातला होता. याप्रकरणी मोतेवारची २०७ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने जप्त केली होती. याप्रकरणी मोतेवारला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती

dagadu sheth
दगडूशेठ गणपती
author img

By

Published : Mar 17, 2021, 8:51 AM IST

पुणे- समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या आमिषाने देशभरातील गुंतवणुकदारांची फसवणूक केली होती. दरम्यान, ठेवीदारांच्या पैशातून संचालक महेश मोतेवार याने दगडूशेठ’ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले आहेत.

गुंतवणुकदारांना गंडा
समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या आमिषाने देशभरातील गुंतवणुकदारांना तब्बल २ हजार ५१२ कोटींचा गंडा घातला होता. याप्रकरणी मोतेवारची २०७ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने जप्त केली होती. याप्रकरणी मोतेवारला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. ठेवीदारांकडून घेतलेल्या पैशांमधून मोतेवार याने २०१३ मध्ये दगडुशेठ गणपतीला सोन्याचा हार, त्रिशुळ, परशु असे ६० लाख ५० हजार रुपयांचे दीड किलोचे दागिने अर्पण केले होते. सीआयडीने मोतेवार याला अटक केल्यानंतर तपासात ही बाब समोर आली होती.

हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : मुख्यमंत्री ठाकरेंनी आज सह्याद्रीवर बोलावली मंत्र्यांची बैठक

हेही वाचा - कोरोना रुग्णवाढीमुळे मुंबईतील शाळांमधील शिक्षकांना वर्क फ्रॉर्म होम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.