ETV Bharat / city

Santosh Jadhav on social media : संतोष जाधवच्या फॅन फॉलोविंगमध्ये चांगल्या घरची मुले, पोलीस पालकांचे करणार समुपदेशन - संतोष जाधव तरुण फॉलोवर्स

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि बिष्णोई ( Santosh Jadhav on social media ) गँगशी संबंधित असलेला आरोपी संतोष जाधव ( Santosh Jadhav social media news ) याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोवर ( Santosh Jadhav followers youth ) असून अनेक सोशल मीडियावरील अकाउंटद्वारे संतोष जाधव हा ग्रामीण भागातील तरुणांना आकर्षित करत आहे.

childrens follow Santosh Jadhav on social media
संतोष जाधव सोशल मीडिया
author img

By

Published : Jun 18, 2022, 2:15 PM IST

Updated : Jun 18, 2022, 2:34 PM IST

पुणे - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि बिष्णोई ( Santosh Jadhav on social media ) गँगशी संबंधित असलेला आरोपी संतोष जाधव ( Santosh Jadhav social media news ) याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोवर ( Santosh Jadhav followers youth ) असून अनेक सोशल मीडियावरील अकाउंटद्वारे संतोष जाधव हा ग्रामीण भागातील तरुणांना आकर्षित करत आहे. त्याच्या सोशल मीडियाच्या फॉलोवरमध्ये चांगल्या चांगल्या घरातील तरुण असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी आत्ता पर्यंत 100 हून अधिक अकाऊंट हे व्हेरिफिकेशन केले असून त्या मुलांच्या पालकांना लवकरच बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात माझा सहभाग नाही, संशयित आरोपी संतोष जाधव याची माहिती

तरुणांना आकर्षित करून टोळीत सहभाग - संतोष जाधव हा त्याच्या दहाहून अधिक सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून रिल्स बनवणे, विविध व्हिडिओ बनवणे, हत्याऱ्यांबरोबर व्हिडिओ बनवणे, असे अनेक व्हिडिओ बनवून तरुणांना आकर्षित करून फॅन फॉलोवर वाढवत आहे. आणि या तरुणांना मग हळूहळू आपल्या टोळीत सहभाग करून घेत आहे. यात प्रामुख्याने 18 ते 28 वयोगटातील तरुणांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे, ज्या मुलाच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे, तो मुलगा आईचे ऐकत नाही, अशा मुलांना जास्त प्रमाणात आकर्षित करून त्यांना टोळीत सहभाग करून घेत आहे.

बिष्णोइ गँगमधील सर्वच मोठे गुन्हेगार आहेत आणि हे आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्याचे काम करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वेगवेगळे फोटो बनवून, रिल्स बनवून तरुणांना आकर्षित करून मोठे गुन्हे करण्यासाठी त्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे, अनेक तरुण या गोष्टीला बळी पडत आहेत. त्यामुळे या गोष्टीला तरुणांनी बळी पडू नये असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले आहे.

पालकांचे समुपदेशन होणार - संतोष जाधवच्या फॅन फॉलोविंगमध्ये चांगल्या घरातली मुलेसुद्धा आहेत. लाईक करणे किंवा फॉलो करणे हा काय गुन्हा नाही. नुसते गुन्हा दाखल करून काही होणार नाही, त्या मुलांच्या पालकांचे समुपदेशन देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

कोण आहे संतोष जाधव? - संतोष जाधव हा मूळचा आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोखरी गावचा आहे. मात्र त्याचे वास्तव्य मंचरमध्ये होते. आई, वडील, बहीण असे चौघे जण मंचरमध्ये राहत होते. मंचर पोलीस स्टेशन हद्दीत राण्या उर्फ ओमकार बानखेले याचा 1 ऑगस्ट 2021 रोजी खून करण्यात आला होता. या खुनात सहभागी असल्याचा गुन्हा संतोषवर दाखल आहे. मंचर पोलीस ठाण्यात एक खंडणीचा, चोरीचा गुन्हा दाखल त्याच्यावर दाखल आहे. राण्या बानखेले खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला होता. या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासून तो राजस्थान, पंजाब हरियाणा या भागात वास्तव्यास होता. त्या परिसरात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. राण्या खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोषला अटक केली आहे.

ग्रामीण तरुणांवर लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रभाव - पुण्याच्या ग्रामीण भागात तरुणांवर लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रभाव असल्याचे समोर येत आहे. या परिसरातील तरुण या गँगच्या मोहोरक्याप्रमाणे आपली पर्सनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कपाळावर लाल कुंकू, दाढी साधारण वाढलेली, अंगावर काळे कपडे, गळ्यात काळी शाल, रुद्राक्षाची माळ, बंदुकी बरोबरचे फोटो असा पेहराव साधारण या गँगचा असतो. संतोष जाधव सुद्धा त्या गँगशी निगडित आहे. याशिवाय त्याने मंचर परिसरात गँग देखील तयार करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.

सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी - पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पुणे कनेक्शन असल्याचे पुढे आल्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पुण्यातील सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोन कुख्यात आरोपीचा सिद्धूच्या हत्याकांडात सहभाग असल्याने पंजाब पोलीस त्यांच्या मागावर आहे. दुसरीकडे पुण्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटनेतही पुणे ग्राणीण पोलीस सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोघांच्या मागावर होते. मात्र, हे दोघेही मिळून आले नव्हते. सिद्धू मुसेवाला हत्याकांडात या दोघांची नावे आल्याने हे पंजाबमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले. त्यामुळे, पुणे पोलीस खडबडून जागे झाले. पुणे पोलिसांनी अगोदर सौरव महाकालच्या मुसक्या आवळल्यानंतर रात्री संतोष जाधवलाही गुजरातमधून अटक केली.

हेही वाचा - Santosh Jadhav : स्वतःची ओळख लपविण्यासाठी संतोषने केले होते मुंडण - एडीजी सरंगल

Last Updated : Jun 18, 2022, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.