ETV Bharat / city

पुण्यात शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना, ८५ रथांचा सहभाग - chhatrapati shivaji maharaj jayanti celebrate in pune

शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून ८५ रथांद्वारे मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

shivjayanti in pune
पुण्यात शिवजयंती उत्साहात साजरी
author img

By

Published : Feb 19, 2020, 8:15 PM IST

पुणे - शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून ८५ रथांद्वारे मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात ८५ स्वराज्यरथ सहभागी झाले होते. हा सोहळा पाहण्यासाठी लालमहालाजवळ शिवभक्तांचा महासागर लोटला होता. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

shivjayanti in pune
पुण्यात शिवजयंती साजरी

फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ, शहाजी शिवज्योत हा मुख्य स्वराज्यरथ होता. त्यामागे एकापाठोपाठ सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ८५ स्वराज्यरथ सहभागी झाले होते. महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना देत ५१ रणशिगांची ललकारी यावेळी देण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवगर्जना ढोलताशा पथकाचा रणगजर, ओम नमो: परिवर्तन महिला लेझीम पथक, सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर व हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

shivjayanti in pune
पुण्यात शिवजयंती साजरी

संगीतकार अजय अतुल, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्याहस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ, शहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करत मिरवणुकीला सुरुवात केली. यावेळी अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. मिरवणुकीचे यंदा ८ वे वर्ष आहे. सोहळ्यामध्ये वीर येसाजी कामठे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. तसेच पांडुरंग बलकवडे लिखीत मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान आणि उद्गार संस्थेच्या 'कवी भूषण के छंद' या सिडीचे अनावरण झाले.

shivjayanti in pune
पुण्यात शिवजयंती उत्साहात साजरी

मिरवणुकीत जिजाऊ, शहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुयार्जी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दयार्सारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव,, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे,पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले.

shivjayanti in pune
पुण्यात शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून ८५ रथांद्वारे मानवंदना

या सोहळ्याने शिवजयंतीला पुण्यात आगळावेगळा इतिहास घडला. महाराणा प्रताप, श्री शिवछत्रपती, छत्रसाल बुंदेले यांच्या मूर्ती असलेला शिवछत्रपती छत्रसाल बुंदेले महाराज स्वराज्यरथ सलग पाचव्या वर्षी दिमाखात सोहळ्यात मिरवत होता. भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱया ५१ रणरागिनींच्या औरंगासूर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युद्धकला सादर केली. शिवगर्जना ढोलताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.