पुणे - पुण्यातील सीबीएससी स्कूल जोग शाळा ( Jog school ) या ठिकाणी प्रथम सत्राचे मार्क घेतलेच नाहीत. त्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेकडून खात्री देऊन त्यांचा रिझल्ट 90% लावण्याची बाब शाळेकडून जाहीर करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ( students ) केवळ 60% रिझल्ट लागल्यामुळे जोक शाळेमध्ये पालक संतप्त ( angary parents at Jog school ) झाले आहेत. जमा झालेले आहेत.
पालकांकडून जाब विचारण्यास सुरुवात - पालकांनी शाळेला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाला सीबीएससी ( CBSE ) जबाबदार आहे का जोग शाळा हे महत्त्वाचा आहे. परंतू तुमचे विद्यार्थी नापास झाले आहेत असे जोग शाळेकडून सांगण्यात आले आहे. त्यावर आमचे विद्यार्थी प्रॉपर आहेत. त्यांची फर्स्ट इंटरची ( first inter ) परीक्षा झाली. त्यांचे मार्क आले तर त्यांचा रिझल्ट वाढेल आणि ते उत्तीर्ण होतील. असे पालकांकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील जोग सीबीएससी स्कूलमध्ये ( Jog CBSE School ) सीबीएससीच्या नियमाप्रमाणे एक्झाम झालेले आहेत सीबीएससी दोन इंटरमध्ये एक्झाम घेते त्यामुळे दोन इंटर मार्क मिळून विद्यार्थ्यांना मार्क दिले जातात.
फर्स्ट इंटर न घेता दुसऱ्या इंटरचे मार्क दिले - परंतु जोग शाळेत विद्यार्थ्यांना फर्स्ट इंटर न घेता दुसऱ्या इंटरचे मार्क दिले गेले. त्यामध्ये बरेच विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक संतप्त होऊन जोग शाळेमध्ये जमा झाले आहेत. परंतू शाळेकडून आणखी कोणीही त्या ठिकाणी उत्तर देण्यास तयार नाहीये. त्यामुळे पालकांचा रोष मात्र सध्या वाढत आहे.
फसवणूक केल्याचा आरोप पालकांकडून - या शाळेचे मुख्य व्यवस्थापक अमोल पुष्कर जो हे या ठिकाणी उपलब्ध नाहीत. पालकांनी त्यांना विचारले असता ते आऊट ऑफ पुणे असल्याचे घरून सांगण्यात आले आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये आता संभ्रमावस्था असून शाळेने आमची फसवणूक केल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.
हेही वाचा - Video : वाघासाठी वाहतूक थांबवली; वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्ग केला मोकळा