ETV Bharat / city

Hindutva leader Milind Ekbote : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेविरोधात गुन्हा दाखल - Milind Ekbote latest news

हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह इतरांवर पुण्यात गुन्हा दाखल ( Hindutva leader Milind Ekbote Booked ) करण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चितावणीखोर भाषण ( Milind Ekbote Provocative Speeches) केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल ( Milind Ekbote Provocative Speeches) करण्यात आला आहे.

Harshvardhan Gaade
हर्षवर्धन गाडे
author img

By

Published : Dec 29, 2021, 12:23 PM IST

पुणे - दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह इतरांवर पुण्यात गुन्हा दाखल ( Hindutva leader Milind Ekbote Booked ) करण्यात आला आहे. पुण्यातील नातूबाग मैदानात समस्त हिंदु आघाडी संघटनेतर्फे शिवप्रतापदिन अर्थात अफझलखान वधाचा आनंदोत्सव या कार्यक्रमाचे 19 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषणात एकबोटे यांनी मुस्लिम व ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या जातील, तसेच धार्मिक श्रद्धांचा अपमान करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद एकबोटेविरोधात गुन्हा दाखल
एकबोटे यांनी केलं चिथावणीखोर भाषणशुक्रवार पेठेतील नातुबाग मैदान येथे समस्त हिंदु आघाडी संघटनेतर्फे शिवप्रतापदिन अर्थात अफझलखान वधाचा आनंदोत्सव या कार्यक्रमाचे 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकबोटे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी मोहन शेटे, दीपक बाबुलाल नागपूरे कालीचरण महाराज (रा. अकोला), कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान) आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल झाले इतरांची नावे आहेत.यावरून वाद होण्याची शक्यता -दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चितावणीखोर भाषणे एकबोटे यांनी केली. तसेच धार्मिक श्रद्धाचा अपमान केला आणि येथे जमलेल्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पोलिसांकडे तक्रार आणि या भाषणाची क्लिप देण्यात आली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावरून वाद होण्याची शक्यता आहे.कालीचरण महाराज यांनी पुण्यात देखील महात्मा गांधी यांच्याबद्दल केलं विधान -नुकतंच रायपूर येथे कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात अपशब्द वापरलं आहे. पण त्याआधी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने आज खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - University Reform Bill : सरकारला विद्यापीठांना आपले शासकीय महामंडळ बनवायचंय - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.