ETV Bharat / city

युती असतानाही तुम्ही 'सामना'मधून शिव्या आणि शाप देतच होते; चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना प्रतिउत्तर

शिवसेना (Shivsena) फक्त गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनाच कळली होती, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी रविवारी केले होते. याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उत्तर दिले आहे. युतीचे सरकार असतानाही तुम्ही 'सामना'मधून शिव्या आणि शाप देतच होतात, असे पाटील म्हणाले.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Dec 13, 2021, 5:24 PM IST

Updated : Dec 13, 2021, 5:43 PM IST

पुणे - दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे गेल्यावरच युती तुटली हे खरं आहे. पण युती ही निवडणुकीनंतर झाली आणि 5 वर्ष सुखाने संसारही झाला. एकत्रित सरकार असताना देखील तुम्ही 'सामना'मधून शिव्या आणि शाप देतच होतात. तरीही एकत्रित संसार चालला केंद्रातही आणि राज्यातही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना लगावला आहे. शिवसेना (Shivsena) फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळली होती, असे वक्तव्य संजय राऊत यांनी रविवारी केले होते.

गोपीनाथ मुंडे असते तर ते आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट असती. परंतु आज जे आमचे नेते आहेत. त्यांचेही प्रयत्न हा युती टिकवण्यासाठीच राहिला, असे यावेळी पाटील म्हणाले. वाराणसी येथील विकास प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधत भाजपतर्फे देशभर 'दिव्य काशी भव्य काशी' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत मांजराई देवी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील - प्रदेशाध्यक्ष, भाजप

देवेंद्र फडणवीस यांनी फॅक्ट मांडली -

रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटले ते त्यांनी फॅक्ट मांडली आहे. त्याचे मन एवढे गदरु नाही. आपल्या संस्कृतीत एकमेकांचे दुष्मन असलो तरी प्रत्येक प्रसंगाला काय करायचे ते माहिती आहे. वाढदिवसाला शुभेच्छाच द्यायच्या असतात. म्हणून फडणवीस यांनी शुभेच्छाच दिल्या आहेत. असे देखील पाटील म्हणाले.

सरकार सर्वांच्या जीवनाशी खेळत आहे आणि मस्त मजा करत आहे -

मी या सरकारला गोंधळी सरकार म्हणतो, कारण यांना काही कळतच नाही की काय चाललं आहे. सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत नव्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे की सर्वच निवडणुका पूढे ढकलण्यात याव्या? हे सरकार काय करत आहे हे त्यांनाच माहीत नाही. आज या राज्यात भ्रष्टाचाराची परिसीमा चाललेली आहे. सरकार सर्वांच्या जीवनाशी खेळत आहे. एसटी कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी अशा सर्वांच्याच जीवनाशी सरकार खेळत आहे आणि मस्त मजा करत आहे, अशी टीका देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

राहुल गांधी हे स्वतःला हिंदू म्हणत असतील तर ...-

राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदू आणि हिंदुत्ववादी विधानांबाबत पाटील म्हणाले की, कन्फ्युजन कन्फ्युजन आणि कन्फ्युजन आहे. हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात काय फरक आहे हे मला माहिती नाही. राहुल गांधी हे स्वतःला हिंदू म्हणत असतील तर त्यांनी मोघलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला पाहिजे. नरेंद्र मोदी जसे एकेका मंदिरांचा कायापालट करत आहे तसे राहुल गांधी यांनी देखील करावा, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

Last Updated : Dec 13, 2021, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.