पुणे - ईडीने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना आता ( Nawab Malik arrest by ED ) अटक केली आहे. त्यांना मंत्री राहण्याचा कोणताही कायदेशीर आणि नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा ( resignation of Nawab Malik ) घ्यावा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला ( Chandrakant Patil on Nawab Malik arrest ) दिला आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ईडी ) रडारवर आले ( Nawab Malik probe by ED ) आहेत. ईडीने चौकशीसाठी सकाळीच नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात ( Nawab Malik in ED office ) नेले होते. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अटक झालेल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे
चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रत्येक वेळेला हे सरकार आंदोलन केल्याशिवाय मान्य करत नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीतदेखील असेच घडले. त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर आरोप -प्रत्यारोप होत आहे. अनेक नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे. आरोप आणि अटक झालेल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ही या राज्याची परंपरा आहे. तसेच ज्या पद्धतीने नवाब मलिक ईडी कार्यालयातून बाहेर येत होते त्याला आमच्या भाषेत कोडगेपणा म्हणतात, असा टोलाही भाजप प्रदेशाध्यांनी लगावला.
हेही वाचा-ED action against Nawab Malik : ईडीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
पहाटे घरावर धाड, दुपारी तीननंतर ईडीडून अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मनी लाँड्रींग प्रकरणात जुन्या मालमत्तांच्या व्यवहारांप्रकरणी मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू होती. सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची चौकशी झाली पहाटेच ईडीचे पथक मलिकांच्या घरी धडकले होते. मलिकांनी यापूर्वी अनेकदा ईडीचे अधिकारी आपल्या घरी छापा टाकणार असल्याचे म्हटले होते. कोणत्याही कारवाईचा सुगावा लागल्यानंतर ते जाहीरपणे त्याची उघडणी करतात. परंतु आज अचानकपणे ईडीच्या कार्यालयात नवाब मलिक दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दुपारी 3 नंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले. त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी त्यांना ईडीने अटक केल्याचे स्पष्ट झाले.