ETV Bharat / city

'...तर किरीट सोमैयांना श्रद्धांजली वाहावी लागली असती'; सोमैयांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

महापालिकेच्या आवारात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया ( Shivsena Attack On Kirit Somaiya ) यांच्यावर आज हल्ला करण्यात आला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil Met With Kirit Somaiya At Sancheti Hospital ) संचेती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

author img

By

Published : Feb 5, 2022, 10:16 PM IST

Updated : Feb 5, 2022, 11:05 PM IST

Chandrakant Patil Met With Kirit Somaiya At Sancheti Hospital

पुणे - महापालिकेच्या आवारात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया ( Shivsena Attack On Kirit Somaiya ) यांच्यावर आज हल्ला करण्यात आला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil Met With Kirit Somaiya At Sancheti Hospital ) संचेती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. आज जो शिवसैनिकांच्यावतीने हल्ला झाला आहे, तो हल्ला नव्हे, तर त्यांना पूर्ण मारण्याची योजना झाली होती. हे राज्य सरकार आहे, की गुंडा राज आहे. सत्तेत असणारा पक्ष जर अशा पद्धतीने कायदा हातात घेत असेल, तर सर्वसामान्य माणसाने काय करायचं. अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच केंद्राची सुरक्षा नसती, तर किरीट सोमैयांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया

'भारतीय जनता पक्ष स्वस्त बसणार नाही'

आज दुपारी भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून महापालिका परिसरात हल्ला करण्यात आला. यावेळी सोमैया हे महापालिकेच्या पायऱ्यांवरून पडले आणि त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमैया यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारकडून सत्य लपवण्याचे काम केले जातं आहे. रांगेने या सरकारचे सर्व प्रकरणे हे बाहेर येत आहेत. किरीट सोमैया यांच्यावर हल्ला करून काहीही होणार नाही. आज जर पुणे पोलिसांनी सुमोटो 307 आणि 326 दाखल केल नाही, तर आम्ही कोर्टात जाऊ आणि जेव्हा जेव्हा कोर्टात गेलो, तेव्हा कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. आत्ता आम्ही स्वस्त बसणार नाही. शिवसेना आत्ता मारामारीत महिलांना देखील घेऊन यायला लागली आहे. पुरुषांकडून आत्ता मारामारी होत नाहीये का, अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा - VIDEO : भाजपा नेते किरीट सोमैयांवर शिवसैनिकांचा हल्ला; पाहा नेमकं काय घडलं?

Last Updated : Feb 5, 2022, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.