ETV Bharat / city

Chandrakant Patil Pune :'...त्यामुळे पुण्यात दोन महानगरपालिका करा' - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शेवाळेवाडी

पुणे महानगरपालिकेचे ( Pune Municipal Corporation ) लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे. असे असताना प्रगती कशी होणार? असा सवाल करत पुण्यामध्ये दोन महानगरपालिका ( Two Municipal Corporations ) व्हायला पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यात बोलताना
चंद्रकांत पाटील पुण्यात बोलताना
author img

By

Published : Feb 27, 2022, 3:20 PM IST

Updated : Feb 27, 2022, 3:37 PM IST

पुणे - पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे ( Pune Municipal Corporation ) लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे. असे असताना प्रगती कशी होणार? असा सवाल करत पुण्यामध्ये दोन महानगरपालिका ( Two Municipal Corporations ) व्हायला पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) यांनी केली आहे. ते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवाळेवाडीत बोलत होते.

पुण्यात सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील

पुणे महानगरपालिका निवडणूक जवळ येत आहे. याच महापालिकेच्या निवडणुकीवरुन आता राजकारण तापताना दिसत आहे. प्रत्येक पक्ष हे कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही, मी आलो आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या मताची भीक मागायला, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

अजित पवारांवर टीका

महानगरपालिकेत गावे समाविष्ट करण्याला माझा विरोधच, यामुळे गावाचे गावपण नष्ट होते. मात्र अजित पवारांना वाटत म्हणून ते निर्णय घेतात, अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे.

वाचला विकास कामांचा पाढा

पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सध्या चंद्रकांत पाटील यांनी दौरे सुरू केले आहेत. शेवाळेवाडी येथे आयोजित सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी मी तुमच्याकडे पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि तुमची मतं बुक करायला आलेलो आहे. असे सांगतच गेल्या पाच वर्षात पुणे महानगरपालिकेमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये किंवा तो सिद्धही झालेला नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आगामी काळातही पुणे महानगरपालिकेत भाजपाचीच सत्ता येणार असून तुम्ही आम्हाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे गावाचे गावपण नष्ट होते आणि शहरात आलेला नागरिकांचा विकासही होत नाही. मात्र अजित पवारांना वाटत आपली महापालिका मोठी व्हावी, नंतर गावातील जमीनी हडप करायला मिळतात, अशी टीकाही त्यावेळी केली आहे.

हेही वाचा - Letter Of Women's Commission : राणे पिता पुत्रांसह चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Last Updated : Feb 27, 2022, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.