ETV Bharat / city

Chandrakant Patil : 'शिवसेना आपल्या जुन्या मुडमध्ये, त्यांची दादागिरी...'; चंद्रकांत पाटलांची टीका - चंद्रकांत पाटल मराठी बातमी

आताची शिवसेना जुनी शिवसेना झाली आहे. शिवसेनेला वाटत नाही की ते सरकारमध्ये आहे. काहीही झाले की लगेच छोंडेंगे नही, असा मूड झाला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर केली ( Chandrakant Patil Criticized shivsena ) आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil
author img

By

Published : May 9, 2022, 5:44 PM IST

पुणे - गेल्या दिवसांपासून शिवसेना आणि राणा दाम्पत्याच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. हा संघर्ष पार हातापाई पर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर आता खासदार नवनीत राणांच्या रुग्णालयातील फोटोवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आताची शिवसेना जुनी शिवसेना झाली आहे. शिवसेनेला वाटत नाही की ते सरकारमध्ये आहे. काहीही झाले की लगेच छोंडेंगे नही, असा मूड झाला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर केली ( Chandrakant Patil Criticized shivsena ) आहे.

चंद्रकांत पाटलांनी आज ( 9 मे ) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची शहरातील विविध प्रश्नांसदर्भात भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यात येणार आहे. त्याबाबात विचारले असता पाटील यांनी सांगितले की, आज एखाद्या वेळेला रंगकर्मींचे नुकसान होईल. पण, भविष्यात मोठी वस्तू तयार होणार आहे. यामुळे अधिक नाटके आणि अधिक सांस्कृतिक कार्यक्रम होतील. कुठलीही वस्तू भव्यदिव्य होतानाच जो वेळ असतो, तो त्रासाचा असतो. पण, तरीही याबाबत रंगकर्मी बरोबर बैठक करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटल प्रसारमाध्यमांशी बोलताना

'उद्धव ठाकरेंच्या सभेला देवेंद्र फडणवीस उत्तर देतील' - राज्यातल्या पोलिसांकडे तक्रार देऊन काय अर्थ नाही. त्यांच्याकडे तक्रार देईपर्यंत चार-पाच फोन येतात. त्यामुळे न्यायालय किंवा केंद्र हे दोनच पर्याय उरतात. दुसरीकडे, 14 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्या सभेला विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस 15 तारखेला उत्तर देतील, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

'...म्हणून केंद्र आणि न्यायालयाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही' - नवनीत राणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्यसरकारबाबत तक्रार करणार आहेत. त्याबाबत पाटील यांनी म्हटले की, या राज्यात आता न्यायालय सोडून कोणाकडूनच न्यायाची अपेक्षा नाही. राज्यात सामन्य नागरिकाला त्रास आणि 'हम करे सो कायदा', असा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे केंद्राकडे आणि न्यायालयाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा - NIA Raid In Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित 20 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी; तिघेजण ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.