पुणे - लोकशाही किती सुदृढ असते ती कोणालाही पळवून लावू शकतो हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे पाहिल्यावर कळते. मी कोणाचे नाव घेत नाही, फक्त टोपी फेकतो ती कोणाला लागेल माहीत नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यश्र शरद पवार यांना नावं न घेता टोला लगावला आहे.
फडणवीसांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन - भाजप : काल, आज आणि उद्या या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राम सातपुते, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे उपस्थित होते. हे पुस्तक शांतनू गुप्ता यांनी लिहिले असून, याचा मराठी अनुवाद मल्हार पांडे यांनी केला आहे.
२०१९ साली शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली होती. याचाच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी पवारांना टोला लगावला आहे.
संजय राऊत लवंगी - यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. रोज सकाळी उठून बोलतात, मीडिया यांना कव्हरेज देते म्हणून यांना वाटते आम्ही जे बोलतो तेच खरे, पण असे नसते. ते खरे लवंगी आहेत. असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.