ETV Bharat / city

Suicide of Young Kirtankar : युवा किर्तनकाराच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल - case registered against policeman

इंदापूर येथील किर्तनकारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका पोलीस शिपायासह त्याच्या अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला ( suicide of young Kirtankar in Indapur ) आहे. संजय मोरे असे आत्महत्या केलेल्या कीर्तनकाराचे नाव ( case registered against policeman ) आहे.

suicide of young Kirtankar
तरुण कीर्तनकाराची आत्महत्या
author img

By

Published : Sep 15, 2022, 11:24 AM IST

पुणे : इंदापूर येथील किर्तनकारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका पोलीस शिपायासह त्याच्या अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला ( suicide of young Kirtankar in Indapur ) आहे. संजय मोरे असे आत्महत्या केलेल्या कीर्तनकाराचे नाव ( case registered against policeman ) आहे. संजय मोरेंनी 10 सप्टेंबरला राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई महादेव जाधव आणि त्यांच्या एका अनोळखी मित्रावर मयताच्या बहिनेने तक्रार दिली होती. यावरून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कीर्तनकार संजय मोरे यांस मारहाण करून शिवीगाळ दमदाटी कीर्तनकार संजय मोरे यांनी आत्महत्या करण्याच्या दोन दिवस आधी, म्हणजे 8 तारखेला आरोपी महादेव जाधव आणि त्याच्या एका साथीदाराने संजय मोरे यांच्या घरी जाऊन एका महाराजांच्या मुलीला फोन का करतोस ? असे म्हणत संजय मोरे यांस मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली होती. त्यांनंतर दोनच दिवसात संजय मोरेंनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

संजय मोरे यांस आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केले ( policeman caused suicide of young Kirtankar ) त्यांनंतर आरोपी हे संजय मोरे यास वारंवार धमकी देणे, शिवीगाळ करून मारहाण करणे सतत फोन करणे, अशा प्रकारे त्याला मानसिक व शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे संजय मोरे यांस आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने संजय मोरे याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं संजय मोरे यांच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

त्यावरून पोलीस महादेव जाधव आणि त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलिसांनी आरोपी विरोधात कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. इंदापूर पोलिसांनी आरोपी पोलीस जाधव याचा अहवाल पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे पाठवला आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ( suicide of young Kirtankar )

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.