ETV Bharat / city

पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल; पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवले

पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे त्यांनी म्हटले होते

case has been registered against bjp mla gopichand padalkar at baramati
गोपीचंद पडळकर - शरद पवार
author img

By

Published : Jun 25, 2020, 4:16 PM IST

बारामती (पुणे) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्याबाबत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवार (दि. २४) पंढरपूर येथे बोलताना शरद पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आज (गुरुवार) याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आमदार पडळकर यांच्या विरोधात कलम ५०५ (२) नुसार तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा... पडळकर माफी मागा, अन्यथा गाढवावरून धिंड काढू; सांगलीत राष्ट्रवादीचे आंदोलन

काय म्हणाले होते पडळकर ?

पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे, असे माझे मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे." असे विधान पडळकर यांना केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.