ETV Bharat / city

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढणार? पुण्यात गुन्हा दाखल - केतकी चितळे तक्रा पुणे राष्ट्रवादी

अभिनेत्री केतकी चितळे ही नेहेमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केल्यामुळे ती अडचणीत आली आहे. मुंबई नंतर पुण्यातही तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

case filed against Ketki Chitale in Pune
केतकी चितळे तक्रार पुणे पोलीस
author img

By

Published : May 14, 2022, 6:55 PM IST

पुणे - अभिनेत्री केतकी चितळे ही नेहेमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केल्यामुळे ती अडचणीत आली आहे. मुंबई नंतर पुण्यातही तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांनी केतकीविरोधात शिवाजीनगर येथील सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

माहिती देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी

हेही वाचा - सर्वांना विश्वासात घेऊनच बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय होणार - माजी महापौर मुरलीधर मोहोळ

अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट केलेल्या कवितेनंतर तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुण्यात देखील तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, एकूणच हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी केतकी चितळेने छत्रपती शिवरायांवर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. त्यानंतर आता केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टने वाद उफाळून आला आहे.

केतकी चितळे, भावे आणि पटलांकर या तीन व्यक्तींच्या विरोधात सायबर सेल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 153 अ, 500, 502, 505, 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या तिघांना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

केतकी चितळे नावाची बाई गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळेला फेसबुकवरती आपल्या वैफल्यग्रस्त अवस्थेमुळे ज्येष्ठ नेत्यांबद्दल/राष्ट्रपुरुषांबद्दल आपली गरळ ओकत असते. चित्रपट सृष्टीमध्ये काम न मिळाल्यामुळे ही बाई अत्यंत वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये कुठेतरी आपल्याला महत्त्व मिळावे म्हणून वारंवार महाराष्ट्राचा अपमान करत असते, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केली.

हेही वाचा - Ketaki Chitale Controversy : 'केतकीला चोप देणार, तेव्हाच तिची अक्कल ठिकाण्यावर येईल'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.