ETV Bharat / city

Etv Bharat Special : हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूदर कमी करणारे कार्डियाक किट

पुण्यातील प्रसिद्ध हार्ट अटॅक स्पेशलिस्ट डॉक्टर सुनील अग्रवाल यांनी एक कार्डियाक किट (Cardiac Kit) तयार केला आहे.हा किट सहज आणि सोप्या पद्धतीच असून आपण दररोज आपल्या बरोबर वापरू शकतो आणि यात असलेल्या औषधांमुळे पेशंट ला लगेच उपचार मिळणार आहे.

Cardiac kit
Cardiac kit
author img

By

Published : Nov 29, 2021, 10:54 PM IST

पुणे :- आजच्या धकाधकीच्या जीवनात कधीही कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.त्यामुळे हार्ट अटॅक प्रसंगी वेळीच उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. पुण्यातील प्रसिद्ध हार्ट अटॅक स्पेशलिस्ट डॉक्टर सुनील अग्रवाल यांनी एक कार्डियाक किट (Cardiac Kit) तयार केला आहे.हा किट सहज आणि सोप्या पद्धतीच असून आपण दररोज आपल्या बरोबर वापरू शकतो. आणि यातील औषधांमुळे पेशंटला लगेच उपचार मिळणार आहे.

मृत्यूदर कमी करणारे कार्डियाक किट
कार्डियाक कीड उपयुक्त ठरणार हृदयविकारानं तर जगभरात जास्त मृत्यू पाहिले आणि दोन तासात योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने होतात. हृदयविकाराचा झटका आल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेणे व त्या दरम्यान प्रथम उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे 40% पेशंटचे प्राण वाचू शकतात. हार्ट अटॅक प्रसंगी उपयोगी पडावी या उद्देशाने बनविण्यात आलेल्या कार्डियाक कीट बनवण्यात आले आहे. या किटमध्ये असलेल्या औषधोपचारामुळे लगेच जागेवर त्या रुग्णाला प्रथमोपचार मिळणार अशी माहिती डॉ.सुनील अग्रवाल यांनी दिली.
Cardiac kits
डॉक्टर सुनील अग्रवाल माहिती देताना
रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी मदत स्टेटस ने भरलेल्या जीवनात जंक फुडने ग्रासलेल्या फास्ट लाइफमध्ये अनेक आजार सध्या वाढत आहे. त्यामुळे आलेल्या सर्व आजारांचा परिणाम हृदयावर पडतो.आणि हार्ट अटॅकचा सामना करावा लागतो. तसेच अटॅक आल्यावर दवाखान्यात जाण्यापर्यंत रुग्णाला आपला जीव गमवावा देखील लागतो. या गोष्टींचा अभ्यास करून ओम मेडिकल फाउंडेशन आणि इंटरनॅशनल लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणारे कार्डियाक किट तयार करण्यात आले आहे. याद्वारे सुमारे पाच हजार पेक्षा अधिक वितरण करण्यात आले आहे. या किटचा हार्ट अटॅक प्रसंगी वापर केल्यास रुग्णाला दवाखान्यात घेऊन हृदय विकाराची तीव्रता कमी करण्यास मदत करते आणि यामुळे रुग्णाला काही वेळ मिळतो जेणेकरून डॉक्टरांना उपचार करण्यास वेळ मिळतो.त्यामुळे काही रुग्णांचा जीव वाचविण्यामध्ये देखील मदत होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने हा किट आपल्यासोबत जवळ बाळगावे असा सल्ला देखील यावेळी डॉक्टर अग्रवाल यांनी दिला.

हेही वाचा - Omicron Virus in Maharashtra : 'ओमिक्रॉन'ला घाबरण्याची गरज नाही - डॉ. प्रदीप आवटे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.