ETV Bharat / city

Teacher Eligibility Test: शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरण! 7880 उमेदवार अपात्र; राज्य शिक्षक परिषदेची कारवाई - Teacher Eligibility Examination Malpractice Case

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी 7880 उमेदवारांना पुढील काळात शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार नाही. ( Teacher Eligibility Test ) राज्य शिक्षक परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा
Teacher Eligibility Test
author img

By

Published : Aug 3, 2022, 7:51 PM IST

Updated : Aug 3, 2022, 8:42 PM IST

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षा (२०१९)च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने या गैरप्रकारामध्ये सहभागी असलेल्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करणे व करण्याबाबतचा निर्णय राज्य शिक्षक परिषदेने घेतला आहे. ( State Teachers Council ) यामध्ये 7880 उमेदवारांना पुढील काळात कायमस्वरूपी शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार नाही, असा निर्णय राज्य शिक्षक परिषदेने घेतला आहे.

उमेदवारांबाबत परीक्षा परिषदेने मोठी कारवाई - शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7880 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केले असल्याचा प्रकार समोर आला होता. ( Teacher Eligibility Examination Malpractice Case ) या उमेदवारांबाबत परीक्षा परिषदेने मोठी कारवाई केली आहे. या 7880 उमेदवारांमधील 293 उमेदवारांनी जी बनावट प्रमाणपत्र तयार केली होती आणि ते आज सेवेत आहे अशा उमेदवारांनाही बडतर्फ करण्यात येणार आहे.

स्वतःस पात्र करून घेतले - सन (२०१९-२०२०)मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत सायबर स्टेशन पुणे शहर येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ( Teacher Eligibility Test ) या प्रकरणी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेसह सुखदेव ढेरे, प्रितेश देशमुख अशा तब्बल 40 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता त्यामध्ये असे निष्पन्न की, ७८८० उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे, प्रत्यक्षात ते असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतलेले आहे.

7880 उमेदवार हे गैरप्रकारामध्ये - शिक्षक पात्रता परीक्षा (२०१९)चा अंतिम निकाल (दि. २८ ऑगस्ट २०२०)रोजी परीक्षा परिषदेच्या स्थळावर प्रसिध्द करण्यात आला. त्यानुसार एकूण १६७०५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 7880 उमेदवार हे गैरप्रकारामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. यात २९३ उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. तर उर्वरीत ८७ उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. या गैरप्रकारमध्ये समाविष्ट परीक्षार्थी/ उमेदवार यांच्याविरुद्ध परीक्षा परिषदेने कारवाई केली आहे.

त्यांच्या नियुक्त्या रद्द - आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक ४८० पानी पत्रक जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यात परिषदेने गैरव्यवहार करणाऱ्या ७८८० उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे. यात परीक्षा दिलेल्या या उमेदवारांना आता कधीही परीक्षा देता येणार नाही. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येणार आहे.

सेवा तात्काळ संपवण्यात यावी - शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (१९ जाने. २०२०) च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या जर नियुक्त्या झाल्या असतील, तर त्यांची सेवा तात्काळ संपवण्यात यावी. आणि याची नोंद नियुक्त्या झालेल्या विभागांनी घ्यावी असे आदेश या पत्रकात देण्यात आले आहेत.

हेही वाचा - Non Cabinet Government : 'या' राज्यातही होते मंत्रिमंडळशिवाय सरकार

Last Updated : Aug 3, 2022, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.