ETV Bharat / city

अवघ्या पंधरा दिवसाच्या वासराला अमानुष मारहाण; मालकावर गुन्हा दाखल - पुणे जिल्हा बातमी

पुणे जवळील नवी सांगवी परिसरात आपल्याच गोठ्यातील अवघ्या १५ दिवसांच्या वासराला दोरी आणि हाताने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

calf too much beating filed a fir against owner
वासराला अमानुष मारहाण
author img

By

Published : Jul 24, 2020, 1:20 AM IST

पुणे - स्वतःच्या मालकीच्या वासराला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब बाजीराव वाळुंज (६१) असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी स्वप्नील पुष्कराज जोशी (२५ रा. पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - दुचाकीच्या मदतीने पिकांची मशागत; लातुरातील तरुण शेतकऱ्याने लढवली शक्कल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब बाजीराव वाळुंज यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या वासराला गोठ्यात हाताने आणि दोरीने अमानुष मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशीयल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, प्राणी मित्रापर्यंत हा व्हिडीओ पोहोचला. त्यांनी व्हिडिओची खात्री करून वाळुंज याच्या विराधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी प्राणीमित्र स्वप्नील यांनी फिर्याद दिली त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.