ETV Bharat / city

सीएए, एनआरसी विरोधात मुस्लिम महिलांचे चोवीस तास ठिय्या आंदोलन - News about CAA, NRC

पुण्याच्या कोंढवा भागातील मुस्लिम महिला सीएए, एनआरसी विरोधात आंदोलन करत आहे. या महिला सहा दिवसांपासून चोवीस तास या ठिकाणी ठिय्या मांडून आंदोलनाला बसल्या आहे.

caa-nrc-against-muslim-womens-agitation
सीएए, एनआरसी विरोधात मुस्लिम महिलांचे चोवीस तास ठिय्या आंदोलन
author img

By

Published : Jan 16, 2020, 10:31 AM IST

पुणे - दिल्लीतील शाहिनबाग या भागातील मुस्लिम महिला गेल्या महिनाभरापासून सीएए आणि एनआरसी या कायद्यांना विरोध करत रस्त्यावर उतरल्या आहेत. त्याच धर्तीवर कोंढवा भागातील मुस्लिम महिला देखील आंदोलन करत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून या महिला चोवीस तास या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्या आहेत. सीएए, एनएनआरसी या कायद्यांना त्यांचा विरोध असून जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे येथील महिलांचे म्हणणे आहे.

सीएए, एनआरसी विरोधात मुस्लिम महिलांचे चोवीस तास ठिय्या आंदोलन

या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मांडव घालण्यात आला असून शेकडो महिला या आंदोलनात सहभागी होत आहेत. अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तरुणींची संख्या देखील या आंदोलनात अधिक आहे. विविध घोषणा या आंदोलनात देण्यात येत आहे. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. अनेक तरुणी भाषणातून या कायद्याला विरोध करत आहेत. संपूर्ण आंदोलन महिलांद्वारे उभे करण्यात आले आहे.

Intro:सीएए, एनआरसी विरोधात मुस्लिम महिलांचे चोवीस तास ठिय्या आंदोलन

दिल्लीतील शाहीनबाग या भागातील मुस्लिम महिला गेल्या महिनाभरापासून सीएए आणि एनआरसी या कायद्यांना विरोध करत रस्त्यावर उतरल्या आहेत. त्याच धर्तीवर कोंढवा भागातील मुस्लिम महिला देखील आंदोलन करत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून या महिला चोवीस तास या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्या आहेत. सीएए, एनएनआरसी या कायद्यांना त्यांचा विरोध असून जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे येथील महिलांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मांडव घालण्यात आला असून शेकडो महिला या आंदोलनात सहभागी होत आहेत. अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तरुणींची संख्या देखील या आंदोलनात अधिक आहे. विविध घोषणा या आंदोलनात देण्यात येत आहे. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. अनेक तरुणी भाषणातून या कायद्याला विरोध करत आहेत. संपूर्ण आंदोलन महिलांद्वारे उभे करण्यात आले आहे. Body:!Conclusion:!
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.