ETV Bharat / city

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई - Avinash Bhosale property seized

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि उद्योगपती अविनाश भोसले यांची तब्बल 40 कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे.

Avinash Bhosale
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले
author img

By

Published : Jun 21, 2021, 8:16 PM IST

पुणे - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि उद्योगपती अविनाश भोसले यांची तब्बल 40 कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. अविनाश भोसले यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुण्यातील घरी छापेमारी देखील करण्यात आली होती. त्यानंतर भोसले यांच्या पुणे, नागपूर आणि गोवा येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या. विदेशी विनियम व्यवस्थापन कायदा 1999 (फेमा) कलम उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांच्या पुणे येथे क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या अधिपत्याखाली येणारी पुण्यातील हॉटेल वेस्ट इन, नागपूर येथील हॉटेल ली मेरिडियन, गोवा येथील हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा, याशिवाय अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यातील एक कोटी 15 लाख रुपये देखील जप्त केले आहेत.

  • अविनाश भोसले कोण आहेत?

मूळचे सातारा जिल्ह्यातील तांबवे गावचे रहिवासी असलेले अविनाश भोसले वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने संगमनेरला गेले. अविनाश भोसले यांनी काही काळ पुण्यात रीक्षा देखील चालवली. या दरम्यान ते छोटी-मोठी बांधकामाची कंत्राटं घेत होते. 1979 मध्ये त्यांनी अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (ABIL) ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

  • रिक्षाचालक ते बांधकाम व्यावसायिक..

पुण्यात रिक्षाचालक म्हणून काम करणाऱ्या भोसले यांनी अल्पावधीत बांधकाम क्षेत्रात काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी साधलेली प्रगती डोळे दिपवणारी आहे. पंचतारांकित हॉटेल, राज्यभरात विविध ठिकाणी मालमत्ता त्यांच्या कंपनीकडे आहेत. मात्र, रिक्षाचालक ते बांधकाम व्यावसायिक हा त्यांच्या आर्थिक प्रगतीचा वेग नेहमीच चर्चेत राहिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.