बारामती ( पुणे ) - भरदिवसा सख्ख्या मावस भावाने तब्बल ३८ वार करून भावाचा निर्घृण खून केल्याचा ( brutal murder in Baramati MIDC ) धक्कादायक प्रकार बारामती एमआयडीसी परिसरातील रुई येथे घडला. गजानन पवार (वय २८,मुळ रा.वसमत,जि.हिंगोली,सध्या रूई. बारामती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव ( Baramati crime news ) आहे. याप्रकरणी मृत तरुणाचा मावस भाऊ संतोष गुळमुळे (रा.वसमत,जि.हिंगोली) याला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन तासात ( Baramati police ) पकडले.
मृत गजानन पवार हे येथील रुई शासकीय रुग्णालयाच्या ( Baramati Rui hospital ) नजीक वास्तव्यास होते. सोमवारी (दि १) ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या दरम्यान गजानन यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याने वडीलांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलाने या घटनेची माहिती शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना दिली.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी-घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी ( Baramati murder CCTV footage ) तात्काळ दाखल झाले. पाहणी दरम्यान पोलिसांना गजानन पवार या तरुणावर तब्बल ३८ वार झाल्याचे दिसून आले. अतिशय क्रूरपणे केलेली हत्या पाहून पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात करून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र त्यात काही सुगावा लागला नाही.
पळून जात असताना अटक-पोलीस तपासात मृत गजानन व त्याचा भाऊ संतोष हे दोघे सलून मध्ये काम करत असल्याचे व संतोष हा सतत नशेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर सलून परिसरात मधील सीसीटीव्ही फुटेची पाहणी केली असता आरोपी संतोष हा तेथून जाताना दिसला. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल, ढाबे आदि ठिकाणी पथक पाठवत संतोषला पकडण्यासाठी शोधमोहिम राबविली. अखेर पळून जात असणाऱ्या संतोषला दोन तासाच्या आत कटफळ येथील रेल्वेस्टेशन वरून ताब्यात घेतले. हा खून रागातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा-Extortion Case : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या नावाने 50 लाखाची खंडणी; तिघांना सुरतमधून अटक