पुणे - सख्ख्या मेहुण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे त्यांच्याविरोधात पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज ढमाले (वय 40) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2018 मध्ये घडला.
ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ढमाले आणि संजय काकडे आणि यांचा भागीदारीत व्यवसाय होता. 2010 पासून ढमाले यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यावरून काकडे आणि ढमाले यांच्यात मतभेद निर्माण झाले.
त्यानंतर फिर्यादी हे 2018 ला संजय काकडे यांच्या घरी गेले असता आरोपी उषा काकडे यांनी ढमाले यांना शिवीगाळ केली. तू आमच्यापासून वेगळे होऊन खूप मोठा झाला आहेस. तुला माज आला आहे. असे म्हणून तुझी समाजात बदनामी करतो म्हणून धमकी दिली.
संजय काकडे यांनी फिर्यादीला "तुला गोळ्या घालून तुझा विषय संपवून टाकीन, तुला व तुझ्या कुटुंबियांना सुपारी देऊन मारून टाकीन" अशी धमकी देत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
चतुःशृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे करीत आहेत.
माजी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल - pune bjp mp sanjay kakade fir news