ETV Bharat / city

बीआरटी मार्गावर आता बूम बॅरिअर, इतर वाहनांच्या घुसखोरीला बसणार आळा - बूम बॅरिअर

पुण्यातील वाढती रहदारी लक्षात घेता पुणेकरांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी पीएमपीएलने बीआरटी बस सेवा सुरू केली. त्यासाठी वेगळा मार्गही तयार केला. मात्र, अनेकदा या बीआरटीच्या मार्गातून अनेकदा खासगी वाहनेच जाताना दिसतात. मात्र, आता याला चाप बसणार आहे. कारण आता बीआरटीच्या मार्गावर बूम बॅरियर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 1, 2022, 8:52 PM IST

पुणे - पुणेकरांचा प्रवास सोपा व्हावा यासाठी पीएमपीएलने ( PMPL ) आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. तेजस्विनीच्या रूपाने महिलांसाठीचा प्रवास असू द्या किंवा एसी बस पुणेकरांसाठी उपलब्ध करुन दिल्या. पुण्यातील वाढती रहदारी लक्षात घेता पुणेकरांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी पीएमपीएलने बीआरटी बस सेवा सुरू केली. पण, अनेकदा या बीआरटीच्या मार्गातून अनेकदा खासगी वाहनेच जाताना दिसतात. मात्र, आता याला चाप बसणार आहे. कारण आता बीआरटीच्या मार्गावर बूम बॅरियर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिती देताना व्यवस्थापक

काय आहे बीआरटी सेवा - कोट्यवधी रुपये खर्चून प्रवाशांचा वेळ वाचवा यासाठी पुण्यात बीआरटी ( BRT ) ही सेवा सुरू झाली होती. अनेक दिवस या बसची सेवा बंद होती. मात्र, ती नंतर सुरू करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी बीआरटीचा मार्गही वेगळा करण्यात आला.

बीआरटीच्या मार्गावरून भलतीच घुसखोरी - त्या मार्गातून बीआरटी बस कमी व इतर वाहतूकच जास्त होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अनेक वेळा दुचाकी, चारचाकी वाहने या मार्गातून जातात. यामुळे अनेक अपघातही झाले आहेत वारंवार प्रशासनाने प्रयत्न करुनही नागरिक नियम मोडताना दिसतात.

बीआरटी मार्गावर आता बूम बॅरिअर - आता या गोष्टीला आळा घालण्यासाठी बूम बॅरिअर ( Boom Barrier ) बसवण्यात आले आहेत. डेक्कन कॉलेज चौकाजवळील बीआरटी मार्गात पीएमपीने पहिला ‘बूम बॅरिअर’ (स्वयंचलित फाटक) बसविला आहे. हा प्रायोगिक तत्वावर असून, लवकरच शहरातील उर्वरित 7 बीआरटी मार्गांवर विविध ठिकाणी बसविण्यात येणार आहे, अशी माहिती बीआरटीचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.

बीआरटी मार्गात इतर वाहनांची होत असलेली घुसखोरी थांबविणे, गरजेचे आहे. यासाठी पीएमपीएल प्रशासनाने 4 बूम बॅरिअर बसविण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार पहिला ‘बूम बॅरिअर’ पीएमपीने ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ या बीआरटी मार्गावर डेक्कन कॉलेजजवळ नुकताच बसविला आहे.

हेही वाचा - Pune Crime News : इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवून छातीत कोयता मारण्याची धमकी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.