मुंबई - बॉलीवुड अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशीची 410 कोटींची संपत्ती ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी जप्त ( Sachin Joshi Assets Seized ED ) केली आहे. यात 330 कोटींचा फ्लॅट, पुण्यातली ८० कोटींची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ही सगळी संपत्ती ओंकार ग्रुप आणि सचिन जोशी यांच्या मालकीची आहे. 2020 ला औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे.
410 कोटींची संपत्ती जप्त -
ईडीने या सगळ्या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे. 410 कोटींची जी संपत्ती जप्त केली आहे. त्यातली 330 कोटींची संपत्ती ही ओंकार ग्रुपची आहे. तर पुण्यातील जमीन 80 कोटींची संपत्ती सचिन जोशी आणि विकिंग ग्रुपची आहे असे ईडीने कारवाईनंतर प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने केली होती अटक -
सुमारे 22 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) ओमकार ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा तसेच अध्यक्ष कमलनाथ गुप्ता यांना अटक केली होती. ओमकार बिल्डर्सने येस बँकेतून घेतलेले 440 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचेही आरोप ईडीने यासर्वांवर ठेवले आहेत. या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप ठेवत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने सचिन जोशी याला फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. तेव्हापासूनच आर्थर रोड जेलमध्ये आहे.
काय आहे प्रकरण -
2020 ला औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये मनी लाँड्रिंगशी संबंधित तक्रार दाखल करण्यात आली होती. याच्याआधारे ईडीने ही कारवाई केली आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यातही ईडीने या प्रकरणाची चौकशी केली होती. यावेळी मेसर्स ओआरडीपीएलचे प्रबंध निर्देशक बाबुलाल वर्मा, मेसर्स ओआरडीपीएलचे अध्यक्ष कमल किशोर आणि सचिन जोशीला अटक केली. 2021 मध्ये या प्रकरणी चार्जशीट देखील दाखल करण्यात आली होती.