पुणे: राज्यात सध्या राजकीय वातावरण हे चांगलच तापलेलं आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेत. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असं राऊतांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. यानंतर पुण्यात सध्या बॅनरबाजीला ( BJP banner hoisting in Pune ) सुरुवात झाली असून, यंदाच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना येऊ दे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसेनेचा व्हिप जारी, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परत येण्याचे आदेश