पुणे - राज्याच्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर काल (दि. 24 फेब्रुवारी)रोजी ईडीमार्फत कारवाई करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. 3 मार्चपर्यंत नवाब मलिक यांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. तर पुण्यात भाजप कार्यकर्ते आक्रमक होत राजीनामा नव्हे तर नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करत आहेत.
नवाब मलिक यांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहे
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने 1993 बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. कोर्टाने त्यांना तीन मार्चपर्यंत कोठडी दिली आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार नवाब मलिक यांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहे. असही ते म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्ष जोपर्यंत मंत्री नवाब मलिक राजीनामा देत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन करणार आहे असही त्यावेळी म्हणाले आहेत.
दाऊदच्या मालमत्तेचे व्यवहार रडारवर
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची चर्चा सुरु होतीच. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.
फडणवीसांनी केले होते आरोप
9 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा खळबळजनक खुलासा केला होता. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले होते. या जमिनी मुंबई बाॅंम्ब स्फोटाच्या आरोपींच्या मालकीच्या आहेत. सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांचे निकटवर्तीय सलीम पटेल यांचे नवाब मलिक यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप फडणविसांनी केला होता. या दोघांनी मुंबईतील एलबीएस रोडवरील कोटय़वधींची जमीन मलिक यांच्या नातेवाईकाच्या एका कंपनीला विकल्याचे म्हणले होते.
3 एकर जमीन केवळ 20-30 लाखांना विकली
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार ही जमीन सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांनी विकली होती. नवाब मलिकही काही काळ या कंपनीशी संबंधित होते. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील 3 एकर जमीन केवळ 20-30 लाखांना विकली गेली, तर त्या जमीनीची बाजारभावा नुसारची किंमत 3.50 कोटींहून अधिक होती. माजी मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरावे केंद्रीय यंत्रणांना देणार असल्याचेही बोलले होते. याच प्रकरणात कारवाई करताना ईडीच्या पथकाने मलिकांना चौकशीसाठी नेले असावे असे बोलले जात होते. यावर ईडीकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेले नव्हती.
कुर्ल्यातील जागाही खरेदी केल्याचा आरोप
1993 च्या बाॅंम्बस्फोटातील आरोपी कड़ून नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांनी कुर्ल्यांताल मोक्याची तीस एकर जागा तीस लाख रुपयांत खरेदी करुन केवळ 20 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. मलिक यांच्या सेलिडस या कंपनीने 2005 मध्ये सलीम पटेल आणि शहावली यांच्या सोबत व्यवहार केल्याचा आरोप आहे. कुर्ला येथील जमिनीचा भाव 2005 मध्ये 2053 रुपये होता. मात्र मलिकांनी 25 रुपये चौैरस फूट दराने खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जमिनीचे वाटप मुखत्यारपत्र सलीम पटेल यांच्याकडे आहे मात्र विक्री सरदार शहावलींच्या नावाने करण्यात आली. तर या जमीन खरेदीच्या कागदपत्रावर फराज मलीक यांची सही असल्याचे दिसते असेही त्यांच्यावर आरोप आहेत.
हेही वाचा - Russia-Ukraine crisis : पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले, लष्करी मोहिमेची घोषणा