ETV Bharat / city

Chandrashekhar Bawankule on PFI: पीएफआयवर बंदी घालण्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी - Offenses of sedition

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजी दरम्यान, पाकिस्तान जिंदाबादचे नारे (Slogans of Pakistan Zindabad) दिल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, पीएफआयवर बंदी (ban PFI) घालण्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (bjp state president Chandrasekhar Bawankule) मागणी केली आहे.

Chandrashekhar Bawankule on PFI
चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Sep 24, 2022, 9:33 PM IST

Updated : Oct 4, 2022, 4:43 PM IST

पुणे पुण्यासह राज्यभरात एनआयएने (NIA) छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजी दरम्यान, पाकिस्तान जिंदाबादचे नारे (Slogans of Pakistan Zindabad) दिल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, पीएफआयवर बंदी (ban PFI) घालण्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (bjp state president Chandrasekhar Bawankule) मागणी केली आहे. संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे (Offenses of sedition) दाखल करा, असंही ते म्हणाले.

पीएफआयवर बंदी घालण्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

ठाकरेंवर टिका आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वेदांत प्रकल्पावरून (vedanta-foxconn project) तळेगाव दाभाडे येथे आंदोलन करण्यात आले. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिका केली असून ते म्हणाले की खोटं बोला पण रेटून बोला सुरू आहे हे आंदोलन खोटं आंदोलन आहे. माझा आदित्य ठाकरेंना सवाल आहे की, महविकास आघाडी सरकारने जर वेदांत बाबत एमओयू केलं असेल तर ते त्यांनी दाखवावा. तसेच जागेबाबत त्यांनी शासन निर्णयाची प्रत देखील दाखवावी. जर नसेल तर ते आंदोलन खोट आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री 18 महिने मंत्रालयात न आल्यामुळे हा प्रकल्प बाहेर गेलं आहे. याला जबाबदार तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. अशी टिका यावेळी बावनकुळे यांनी केली.

एकनाथ खडसे भाजपवापसी करणार का? राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadase meets amit shah) यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, एकनाथ खडसेंबद्दल मला माहिती नाही. भाजपकडे तसा कोणता प्रस्ताव नाही. अमित शहा यांना भेटले असतील तर त्यांना खडसेंना माहिती असेल. तसेच ते परत येण्यासाठी माझ्याबरोबर काहीच बोलले नाही अस देखील बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रवादीत राजकीय ब्लास्ट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर असून याबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर आम्ही ठरवले आहे की घड्याळ बारामतीत बंद करणार यासाठी प्रयत्न करणार आहे. अस देखील यावेळी बावनकुळे म्हणाले. दसरा मेळाव्याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, दसरा मेळाव्यात टोमणे सभा होणार आहे. काल अजित पवार यांनी जी खदखद व्यक्त केली त्यावर बावनकुळे म्हणाले की अजितदादांना गृहमंत्री पद हवे होते. त्यांची ती योग्यता होती. फक्त काँग्रेस, शिवसेनेत नाही तर राष्ट्रवादीमध्ये ही धुसफूस आहे. त्यामुळे महाराष्ट्र अडीच वर्षांत मागे पडला. आत्ता लवकरच एक दिवस असा येणार की राष्ट्रवादीत राजकीय ब्लास्ट होणार आहे अस देखील यावेळी बावनकुळे म्हणाले.

Last Updated : Oct 4, 2022, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.