ETV Bharat / city

छत्रपती शिवाजी महाराजांची वोट बँक ते शरद पवारांचे राजकारण . . . वाचा भाजप प्रदेशाध्यक्षांचे वादग्रस्त वक्तव्य - चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी वाद

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या अगोदर त्यांनी विविध वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, त्याचा ईटीव्ही भारतने घेतलेले हा आढावा.

Chandrakant Patil
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : May 27, 2022, 3:06 PM IST

पुणे - आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवराय यांनी हिंदू वोट बँक विकसित केलीपासून ते शरद पवार हे राजकारणातील छोटे नेते असल्याचे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला आहे. त्यांची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्य खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी . .

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस ! - राजकीय पक्षांकडून उमेदवारांना निवडणूक तिकिटांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा रोख हिंदू वोट बँकेपर्यंत नेला. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवला' असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ उडाला होता. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.

मूठभर शेतकऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे कायदे ठरत नसतात - कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मूठभर शेतकऱ्यांमुळे कायदे ठरत नसतात' असं म्हणत शेतकरी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली होती.

कोणीतरी आक्रमण केल्याने ते मुस्लिम झाले - कोकणातली स्थानिक मुस्लिम हे गाडगीळ किंवा दाते होते, कोणीतरी आक्रमण केल्याने ते मुस्लिम झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या वतीने चंद्रकांत पाटलांचा निषेध देखील करण्यात आला होता.

राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे मात्र . . - राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी एका मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.

सुप्रिया सुळे यांच्यावर देखील वादग्रस्त वक्तव्य - दोन दिवसांपूर्वी भाजपच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.