ETV Bharat / city

रात गई बात गई..! भाजप कधीही मनात खुन्नस ठेऊन काम करत नाही - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील यांची राणे प्रकरणावर प्रतिक्रिया

भारतीय जनता पार्टी कधीही मनामध्ये खुन्नस ठेवून काम करत नाही, अशी प्रक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच नारायण राणे जेवताना त्यांच्या हातातील ताट काढून घेण्यात आले, हा जो काही प्रकार झाला तो खूप अमानवी होता, असेही पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Aug 25, 2021, 12:36 PM IST

पुणे - महाराष्ट्रात मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि जामिनावर सुटका, तसेच सेना भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या राड्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर नारायण राणे यांच्यावर झालेल्या कारवाईवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मंगळवारी दिवसभर झालेला राजकीय खेळ पूर्णपणे सूडबुद्धीने झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने मांडलेला कुठलाही मुद्दा न्यायालयात टिकला नाही. त्यामुळेच न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन दिला. या घटनेत हे स्पष्ट झाले की सत्याचा विजय झाला. कायद्याच्या कचाट्यात अडकवणारी या सरकारची एकही गोष्ट कोर्टात टिकली नाही. कोर्टात यांना थपडा खायला लागल्या. न्यायालयाने त्यांना कायदा हातात घेऊन दुरुपयोग केला असल्याचे आतापर्यंत सांगितले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

रात गई बात गई, तो प्रकार अमानवीय-

भारतीय जनता पार्टी कधीही मनामध्ये खुन्नस ठेवून काम करत नाही. रात गई बात गई, त्यांना आता जामीन मिळाला आहे. परंतु त्यांच्या सोबत मंगळवारी जो काही प्रकार झाला तो खूप अमानवी होता. जेवताना त्यांच्या हातातील ताट काढून घेण्यात आले. त्यांची तब्येत खूप बिघडली. त्यांची शुगर जामीन झाल्यानंतर पाचशे होती. त्यांचा बीपी वाढला होता. अटक करत असतानाच त्यांना डॉक्टरांनी हे सर्व सांगितले होते. परंतु त्यांना कुठलीही वैद्यकीय ट्रीटमेंट दिली नाही. त्यामुळे नारायण राणे एखादा दिवस विश्रांती घेतील आणि त्यांची तब्येत पुन्हा नॉर्मल झाल्यानंतर बहुदा ते जनआशीर्वाद यात्रेसा सुरुवात करतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

सरकार किती घाबरट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, मंगळवार रात्रीपासून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लावली. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई आणि रायगडमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहता सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. काही प्रमाणात शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

परब विरोधात कोर्टात जाणार -

अनिल परब यांच्या प्रकरणात आम्ही कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. त्याची क्लिप संपूर्ण जगाने पाहिली. पोलिसांच्या आणि गुंडांच्या बळावर हे सरकार चालले आहे. यांच्यात हिम्मत नाही सरकार चालवण्याची. ती क्लिप घेऊन आम्ही न्यायालयात जाणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

संजय राऊत यांचे प्रवचन दररोजच ठरलेले-

उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यबद्दलचा संदर्भात चुकवला. त्यांना बिलकुल ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आपले अपयश चुकविण्यासाठी त्यांनी नारायण राणेंवर अशा प्रकारे कारवाई केली. आणि ते कोर्टात टिकले नाहीत, त्यामुळे शिवसेनेच्या फुग्याला भोक पडले आहे. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखाला आम्ही किंमत देत नाही. संजय राऊत यांचे प्रवचन दररोजच ठरलेले आहे. संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहेत ते आरोप दाबण्यासाठी त्या महिलेला तुरुंगात जायला भाग पाडले. हा सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.