ETV Bharat / city

'पीएमपीएमएल' बंद करू नका; संचारबंदीमधील काही निर्बंधांना भाजपचा विरोध - BJP opposes some restrictions on curfew

पीएमपीएमएल बस सेवा बंद ठेवण्याला आमचा विरोध आहे. शहरात बेडची संख्या वाढवण्याची गरज आहे. सायंकाळी सहानंतर संचारबंदी न करता रात्री आठनंतर संचारबंदी करावी, अशी मागणी बापट यांनी केली आहे.

girish bapat
भाजप खासदार गिरीश बापट
author img

By

Published : Apr 2, 2021, 5:58 PM IST

Updated : Apr 2, 2021, 6:28 PM IST

पुणे - शहर आणि जिल्ह्यात वाढत असणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, यातल्या काही निर्बंधांना भाजप खासदार गिरीश बापट यांनी विरोध दर्शवला आहे. सध्याच्या परिस्थितीत कडक पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र, नागरिकांचे हाल व्हायला नको त्यामुळें पुण्यात लावलेल्या काही निर्बंधांना विरोध असल्याचे खासदार बापट म्हणाले.

माहिती देताना खासदार गिरीश बापट

हेही वाचा - 'कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर जास्तीत जास्त लसीकरण हाच सध्या पर्याय वाटतो'

काही निर्बंधांना भाजपचा विरोध

दरम्यान, काही कारणास्तव बाहेर असलेल्या नागरिकांना पोलिसांनी उठसुठ मारहाण करू नये, तारतम्य ठेऊन वागावे, असें खासदार बापट म्हणाले. पीएमपीएमएल बस सेवा बंद ठेवण्याला आमचा विरोध आहे. शहरात बेडची संख्या वाढवण्याची गरज आहे. सायंकाळी सहानंतर संचारबंदी न करता रात्री आठनंतर संचारबंदी करावी, अशी मागणी बापट यांनी केली आहे. हॉटेल बंद ठेवायलाही बापट यांनी विरोध केला आहे. अनेकदा लोकं हॉटेलात बसून गप्पा मारत जेवतात, तर मग हॉटेलमध्ये उभे राहून खाद्यपदार्थ खायला परवानगी द्या, असे बापट यांनी सांगितले. त्यामुळे हॉटेल पूर्ण बंद न करता उभे राहून खायला परवानगी द्या, असे बापट म्हणाले.

हेही वाचा - पुणे शहरात प्लाझ्माचा तुटवडा; दिवसाला फक्त 10 टक्केच प्लाझ्मा दान

Last Updated : Apr 2, 2021, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.