ETV Bharat / city

...म्हणून भाजपाला ज्योतिष बदलण्याची गरज; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची खोचक टीका

भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांना काहींनाकाही भाकीत करण्याची सवय आहे. मात्र, भाजपामध्ये जो ज्योतिष आहे, जो भविष्य बदलत असतो. तो आता त्यांना बदलण्याची गरज आहे, असा खोचक टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

balasaheb thorat critisize bjp
balasaheb thorat critisize bjp
author img

By

Published : Oct 2, 2021, 11:51 AM IST

पुणे - महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांना काहींनाकाही भाकीत करण्याची सवय आहे. मात्र, भाजपामध्ये जो ज्योतिष आहे, जो भविष्य बदलत असतो. तो आता त्यांना बदलण्याची गरज आहे, असा खोचक टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुणे स्टेशन येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभी -

मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टी झाली ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी मराठवाडा येथे झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेले आहे. तेथील परिस्थितीवर आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्याला मदत करणे हे महत्त्वाच आहे. त्याला कोणते दुष्काळ म्हणणे हे महत्त्वाचे नाही. शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे महाविकस आघाडी सरकार ही उभी आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

'काँग्रेस हा एक विचार आहे' -

पंजाबमधील राजकीय नाट्यावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहे. अनके कठीण दिवस हे काँग्रेसने पाहिले आहे. जर आपण इतिहास बघितला तर काँग्रेस हा विचार आहे. तो सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजलेला आहे. या घडामोडीनंतरदेखील काँग्रेस पुन्हा उभी राहिलेली आपल्याला पहिला मिळेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - धक्कादायक! नागपूरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या कौमार्याच्या विक्रीचा प्रयत्न; तीन महिलांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.