ETV Bharat / city

पुण्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी केंद्राची मदत घ्या, भाजपा आमदाराची मागणी - भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे बातमी

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील प्रशासन जरी कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असले, तरीही शहरातील वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुण्यातील भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

BJP MLA Siddharth Shirole
भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे
author img

By

Published : Jul 18, 2020, 4:57 PM IST

पुणे - मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील प्रशासन जरी कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असले, तरीही शहरातील वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुण्यातील भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहेत.

भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - अंतिम वर्ष परीक्षेच्या निर्णयाविरोधात युवासेना सर्वोच्च न्यायालयात; रीट याचिका केली दाखल

महाराष्ट्रात कोरोनाची पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण दररोज मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्याप्रमाणात आरोग्याच्या सुविधा मात्र नाहीत. लॉकडाऊनच्या काळात आरोग्याच्या सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. त्या तयार झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची नामुष्की आली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांना आवश्यक ते उपचार मिळत नाहीत. बेड्स उपलब्ध नाहीत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने पुण्यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

कोरोनाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी एकदाची चर्चा केली नाही...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजवर एकदाही लोकप्रतिनिधींशी चर्चा केली नाही. या परिस्थितीत प्रत्यक्षात चर्चा शक्य नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तरी चर्चा करायला हवी होती. ही चर्चा झाली असती तर आम्हाला त्यांच्याकडे पुणेकरांच्या समस्या मांडता आल्या असत्या. कोरोनाला हरवण्यासाठी पालकमंत्री, महापौर, नगरसेवक असे सर्वजण प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. ते होतांना दिसत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने पुण्यात हस्तक्षेप करून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणावी, यासाठी मागणी केल्याचे सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

हेही वाचा - फडणवीसांच्या दिल्लीतील गाठी-भेटी सुरूच; मोदी-शाह यांच्या भेटीनंतर आज भाजपाध्यक्षांना भेटणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.