मुंबई - भाजप नेते किरीट सोमै्या हे मागील आठवड्यात पुणे महापालिकेत आले असता शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. (Shivsena Attack Kirit Somaiya) या आंदोलनात किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती. ज्यामध्ये ते जखमी झाले होते. एवढेच नाही तर भाजप नेते किरीट सोमय्या हे या धककबुक्कीत महापालिकेच्या पायऱ्यांवरती पडले देखील होते. (Kirit Somaiya In Pune) दरम्यान, आज किरीट सोमय्या यांचा पुणे भाजपने सत्कार आयोजीत केला आहे. (BJP leader Kirit Somaiya arrives in Pune) त्यासाठी सोमैया हे पुण्यात दाखल झाले असून दुपारी 4 वाजेच्या सुमारास पुणे महापालिकेत हा कार्यक्रम होणार आहे. (Congress opposes Kirit Somaiya) दरम्यान, त्यादिवसी झालेल्या प्रकारामुळे आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंदोलन करण्यात येईल असा इशारा
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार शहराच्या परंपरेनुसार पुणे महानगरपालिकेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. (Kirit Somaiya on Pune Visit) जर पालिका प्रशासनाने किरीट सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला परवानगी दिली तर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील काँग्रेसने दिला आहे.
शिवसैनिक आक्रमक -
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केली होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्याकरिता किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावरून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. महापालिका परिसरात शिवसैनिकांनी सोमैयांवर हल्ला केला. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीदरम्यान सोमैयांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जशास तसं उत्तर देऊ- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजप नेते किरीट सोमय्या आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला.यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर संचेती रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक झाले आहे.
भाजप जशास तसे उत्तर देईल
ते यावेळी म्हणाले की पाण्याखालील वाळू घसरली की माणूस बेफाम होतो त्याला हे कळत नाही के आपण काय करत आहो.आत्ता शिवसैनिकांचा मूळ चेहेरा समोर यायला लागला आहे. त्यांनी कितीही काही केलं तरी सोमय्या शांत बसणार नाही. ते त्यांचा काम करतील आणि आज जे झालं आहे त्याबाबत भाजप जशास तसे उत्तर देईल आणि याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई देखील करू, असे देखील पाटील यावेळी म्हणाले.
अक्षरशः पायरीवर पडलेले पाहायला मिळाले
पुण्यात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या अक्षरशः पायरीवर पडलेले पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले.
हेही वाचा - CM Comment On Bjp : आम्ही उठसूठ राजभवनाची वारी करत नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला चिमटा