ETV Bharat / city

'संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा' - sanjay rathod news

पुणे पोलिसांनी या केसमध्ये काही करायचे नाही, तपासच करायचा नाही, असे ठरवलेले आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

chitra wagh
chitra wagh
author img

By

Published : Feb 25, 2021, 2:53 PM IST

Updated : Feb 25, 2021, 3:20 PM IST

पुणे - पूजा चव्हाण प्रकरणात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. पोलिसांवर कुठला दबाव आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

'पोलीस अधिकारी अत्यंत रग्गेल'

पूजा चव्हाण प्रकरणाचे तपास अधिकारी असलेले वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अत्यंत रग्गेल अधिकारी आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणात कुठलीच माहिती नाही. पुणे पोलिसांनी या प्रकरणात सुमोटो केस दाखल का केली नाही. या प्रकरणातील त्या दोन तरुणांची चौकशी का केली नाही, असे प्रश्न वाघ यांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी गुरुवारी पुण्यात येऊन पूजा चव्हाण प्रकरणात घटनास्थळाची पाहणी केली, त्यानंतर पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. पुणे पोलिसांनी या केसमध्ये काही करायचे नाही, तपासच करायचा नाही, असे ठरवलेले आहे, असा आरोप त्यांनी केला.

'अशी घाण राज्याच्या मंत्रिमंडळात नको'

संबंधित पोलीस निरीक्षकाला चालवणारा बाप कोण हे शोधण्याची गरज आहे, अशी टीका त्यांनी केली. या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये बलात्काऱ्यांना वाचविण्यासाठी चढाओढ लागली आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. शरद पवार यांना चुकीची माहिती दिली गेली आहे. ते अशा लोकांना पाठीशी घालणार नाहीत, असा विश्वास असल्याचे सांगत बलात्कारी आणि हत्यारा संजय राठोड यांची मंत्रीमंडळातून गच्छंती करावी, अशी घाण राज्याच्या मंत्रिमंडळात नको, असेही त्या म्हणाल्या.

Last Updated : Feb 25, 2021, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.