ETV Bharat / city

राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? वाचा काय म्हणाले जयंत पाटील...

भारतीय जनता पक्षाची विचारधारा वेगळी असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपबरोबर जाणार नाही. मात्र, दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने शिवसेनेबरोबर जाण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

जयंत पाटील
author img

By

Published : Nov 18, 2019, 1:56 PM IST

पुणे - राज्यातील राष्ट्रपती राजवट, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सरकारची स्थापना तसेच सत्ता स्थापनेसाठी कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, या विषयावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी पुण्यात झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा... 'बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजप-शिवसेनेची व्हिडिओबाजी; सेनेला शहाणपण शिकवण्याची गरज नाही'

राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी वेळ आलीच तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्ता स्थापन करेल का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता, आम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, ज्यांना आम्ही विचाराने पराभूत केले. जे आमच्यापेक्षा वैचारिक दृष्ट्या भिन्न विचाराचे आहेत. त्यामुळे त्यांच्या किती जवळ जायचे? याला काही मर्यादा असू शकतात, असे जयंत पाटील म्हणाले. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची, विधानसभा सदस्यांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची जी अपेक्षा आहे तीच भूमिका पक्षाचीही असेल. तरीही पक्षप्रमुख म्हणून शरद पवारच यावर योग्य निर्णय घेतील, असे सांगत जयंत पाटील अप्रत्यक्षपणे भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती होणार नसल्याचे सांगितले.

हेही वाचा... शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर

पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी मोदीबागेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची रविवारी बैठक झाली. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

हेही वाचा... महाशिवआघाडीबाबत अद्याप काही ठरलं नाही, १९ नोव्हेंबरनंतरच निर्णय - अजित पवार

आमच्याकडे मेगा भरती नाही तर मिरीट भरती

भाजपचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांचे नाव आता मी जाहीर करणार नाही. त्यांच्यासाठी ते अडचणीचे होईल. इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले आणि काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, असे असले तरीही आम्ही मेगा भरती करणार नाही तर मेरीट भरती करणार आहोत, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

शिवसेना म्हणजे, दगडापेक्षा वीट मऊ

भाजपची विचारधारा व आमची विचारधारा वेगळी आहे. आम्ही कधीही त्यांच्या बरोबर जाणार नाही. असे म्हणणाऱ्या पाटील यांना शिवसेनेबरोबर कसे काय? असे विचारले असता, दगडापेक्षा वीट मऊ असे उत्तर देऊन त्यांनी, जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार, पण तेही स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

Intro:राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? पहा काय म्हणाले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी वेळ आलीच तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्ता स्थापन करेल का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारला होता.. त्यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, आम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, ज्यांना आम्ही विचाराने पराभूत केले..जे आमच्यापेक्षा वैचारिक दृष्ट्या भिन्न विचाराचे आहेत, त्यांच्या किती जवळ जायचं याला काही मर्यादा असू शकतात. त्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची, विधानसभा सदस्यांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची जी अपेक्षा आहे तीच भूमिका पक्षाचीही असेल. तरीही पक्षप्रमुख म्हणून शरद पवारच यावर योग्य प्रकाश टाकतील. असे सांगत जयंत पाटील अप्रत्यक्षपणे भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती होणार नसल्याचे सांगितले.
Body:पुण्यातील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या मोदीबागेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठकीला सुरवात झाली आहे..शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकील जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत. तत्पुर्वी बैठकीसाठी आत जात असताना पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलीConclusion:आमच्याकडे मेगा भरती नाही तर मिरीट भरती

जयंत पाटील म्हणाले, भाजपचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात मात्र त्यांचे नाव आता मी जाहीर करणार नाही, त्यांच्यासाठी ते अडचणीचं होईल. इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले आणि काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र असे असले तरीही आम्ही मेगा भरती करणार नाही तर मिरीट भरती करणार आहोत.

शिवसेना म्हणजे, दगडापेक्षा वीट मऊ

भाजपची विचारधारा व आमची विचारधारा वेगळी आहे.आम्ही कधीही त्यांच्या बरोबर जाणार नाही. असे
म्हणणाऱ्या पाटील यांना शिवसेनेबरोबर कसे काय असे विचारले असता, दगडापेक्षा वीट मऊ असे उत्तर देऊन त्यांनी, जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार पण तेही स्थिर सरकार देण्या बाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.