पुणे - भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती आमदार आणि निवडणूक समन्वयक विजय काळे यांनी दिली.
काळेंनी माहिती देताना सांगितले, पुण्यात भाजपने सर्व विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मेळावे आणि पदयात्रांचे आयोजन केले होते. त्याप्रमाणेच मतदार याद्या तपासणीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. शहरात महायुतीचे सुमारे २५ हजार कार्यकर्ते काम करत आहेत. सुमारे २०० सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.