ETV Bharat / city

पुण्यात  विद्यमान आमदार, खासदारांवर नाराज भाजप कार्यकर्त्यांची 'पोस्टरबाजी' - पुणे भजप बातमी

पुण्यातील शिवाजी नगर विधानसभा मतदार संघातील भाजपमध्ये पोस्टर बाजी. यामुळे पुणे भाजप मधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी लावलेले पोस्टर
author img

By

Published : Sep 27, 2019, 6:27 PM IST

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातल्या शिवाजीनगर परिसरात नाराज भाजप कर्यकर्त्यांनी पोस्टर लावले आहेत. यामुळे शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. शिवाजीनगरचा विद्यमान आमदार झोप काढतोय, विद्यमान खासदार पीएसाठी लढतोय, माजी खासदार मुलासाठी नडतोय मग सामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय आम्हाला संधी कधी?. असे पोस्टर शिवाजीनगर भागात काही ठिकाणी लागल्याने भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवड : सत्ताधारी भाजप नगरसेवकावरच उपोषणाची वेळ; राष्ट्रवादीचा पाठिंबा

भाजपमध्ये विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खास करून शिवाजीनगर मतदारसंघात मोठ्या संख्येने भाजपमध्ये इच्छुक आहेत. विद्यमान आमदार विजय काळे यांच्या याबाबत पक्षात मोठी नाराजी आहे. कार्यकर्त्यांनी खुलेआमपणे इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान विजय काळे यांच्या विरोधात नाराजी देखील व्यक्त केली होती. विजय काळे हे निष्क्रिय आमदार असल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी संधी देऊ नये अशी शिवाजीनगर मधल्या भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विजय काळे पुन्हा उमेदवारीसाठी जोर लावत असताना विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निवडणूक प्रसिद्धीचे काम पाहणारे सुनील माने नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आता ते शिवाजीनगर मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी जोर लावला आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी पक्षाचा निर्णय मान्य करत माघार घेतली होती. त्यामुळे ते आता मुलासाठी शिवाजीनगर मतदारसंघात जोर लावत आहेत. ही सगळी परिस्थिती असल्याने शिवाजीनगर परिसरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे या पोस्टच्या माध्यमातून समोर येते आहे.

हेही वाचा - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने, ईडीच्या कारवाईचा निषेध

Intro:विद्यमान आमदार खासदारावर नाराज भाजप कार्यकर्त्यांची Body:mh_pun_01_shivajinagar_bjp_ossue_av_7201348

anchor
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातल्या शिवाजीनगर परिसरात नाराज भाजप कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टर मुळे शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष यामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे शिवाजीनगर चा विद्यमान आमदार झोपा काढतोय विद्यमान खासदार साठी पीए साठी लढतोय तर माजी खासदार मुलासाठी नडतोय मग सामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय आम्हाला संधी कधी असे पोस्टर शिवाजीनगर भागात काही ठिकाणी लागल्याने भाजप मधील वाद चव्हाट्यावर आला आहे... भाजपमध्ये विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे खास करून शिवाजीनगर मतदारसंघात मोठ्या संख्येने भाजपमध्ये इच्छुक आहेत विद्यमान आमदार विजय काळे यांच्या याबाबत पक्षात मोठी नाराजी असून कार्यकर्त्यांनी खुलेआमपणे इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान विजय काळे यांच्या विरोधात नाराजी देखील व्यक्त केली होती विजय काळे हे निष्क्रिय आमदार असल्याचं भाजपचे कार्यकर्ते सांगत आहे त्यामुळे त्यांना यावेळी संधी देऊ नये अशी शिवाजीनगर मधल्या भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे इकडे विजय काळे पुन्हा उमेदवारीसाठी जोर लावत असताना विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निवडणूक प्रसिद्धीचे काम पाहणारे सुनील माने नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत आणि आता ते शिवाजीनगर मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी जोर लावला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी पक्षाचा निर्णय मान्य करत माघार घेतली होती त्यामुळे ते आता मुलासाठी शिवाजीनगर मतदारसंघात जोर लावत आहेत ही सगळी परिस्थिती असल्याने शिवाजीनगर परिसरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं या पोस्टच्या माध्यमातून समोर येते आहे...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.