पुणे - गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडे २० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल मिळाले असून नाशिक फाटा येथून त्याला अटक करण्यात आली. अमोल अर्जुन परदेशी (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पुण्यात तरुणींसमोरच रोडरोमिओंना काढाव्या लागल्या उठाबशा
भोसरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकारी गस्त घालत होते. तेव्हा, कर्मचारी सुमित दत्तात्रय देवकर आणि सुमित रासकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, कासारवाडी येथील रेल्वे स्थानकाच्या जवळ एक व्यक्ती कमरेला गावठी पिस्तूल लावून उभा असल्याचे समजले. त्यानुसार त्या ठिकाणची माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सापळा लावून आरोपी अमोलला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा - पुण्यातील 'त्या' चिमुरडीची हत्या वडिलांसोबतच्या पूर्ववैमनस्यातून; २४ तासात आरोपी जेरबंद
त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २० हजार रुपयांची लोखंडी गावठी पिस्तूल मिळून आली. आर्म ऍक्टनुसार भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेंद्र गाढवे, कर्मचारी सुमित देवकर, सुमित रासकर, संतोष महाडिक यांनी केली आहे.