पुणे :- भीमा कोरेगाव (Bhima Koregaon Vijay Diwas) येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी हे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र येत असतात. मात्र, गेल्या वर्षी यंदा देखील कोरोनाचे सावट असल्याने नियमावलीचे पालन करून अनुयायींनी विजयस्तंभाला मानवंदना द्यावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
भीमा कोरेगाव विजय दिनाचा घेतलेला आढावा भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 या दिवशी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ.स्टाटन यांच्या नेतृत्वातील महार बटालियनच्या 500 सैनिकांनी 28000 पेशवा सैन्याचा पराभव केला. महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा इथं ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या विजयस्तंभाला मानवंदना दिली. भीमा कोरेगावची लढाई म्हणजे अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेल्या पहिला बंड होता आणि त्याच लढाईत महार समाजाला यश मिळाले म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाची आठवण म्हणून अजूनही आंबेडकर अनुयायी या विजयस्तंभाला भेट देतात. याचाच आढावा घेतला 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी..हेही वाचा - Bhima Koregaon Commission : भीमा कोरेगाव आयोगाला राज्य सरकारकडून सहा महिन्यांची मुदत वाढ