ETV Bharat / city

काही काळापूर्वी हॉटस्पॉट असलेले भवानी पेठ कोरोनामुक्तीच्या दिशेने - पुणे लेटेस्ट कोरोना न्यूज

शहरात काही काळापूर्वी सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आता फक्त 70 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. काही काळापूर्वी देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे पुणे शहरात आढळून येत होते. त्यातही पुण्यातील भवानी पेठेत सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. शहरातील सर्वात पहिला मायक्रो कटेन्मेंन झोन म्हणूनही भवानी पेठची ओळख निर्माण झाली होती.

भवानी पेठ कोरोना मुक्तीच्या दिशेने
भवानी पेठ कोरोना मुक्तीच्या दिशेने
author img

By

Published : Jan 8, 2021, 5:33 PM IST

पुणे - कोरोनाच्या सुरवातीला पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण आणि शहरातील पहिला हॉटस्पॉट ठरलेला भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय परिसर आता कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत फक्त 70 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहे.

शहरात काही काळापूर्वी सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आता फक्त 70 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. काही काळापूर्वी देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे पुणे शहरात आढळून येत होते. त्यातही पुण्यातील भवानी पेठेत सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. शहरातील सर्वात पहिला मायक्रो कटेन्मेंन झोन म्हणूनही भवानी पेठची ओळख निर्माण झाली होती.

काही काळापूर्वी हॉटस्पॉट असलेले भवानी पेठ कोरोनामुक्तीच्या दिशेने

हेही वाचा - मेट्रोने मुळा नदीतील काम थांबवावे, अन्यथा पूर परिस्थितीची शक्यता - मनसे

दररोज 500 ते 600 रुग्ण आढळून येत होते

राज्यात पुणे शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळला. त्यानंतर पुणे शहरात कोरोना रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होत गेली. हळूहळू देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पुण्यात आढळून आले. पुण्यातही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनच्या काळात भवानी पेठेत सुरवातीला दिवसाला 100 च्या आसपास रुग्ण आढळून येत होते आणि त्यानंतर जून जुलै महिन्यात हा आकडा वाढून दिवसाला 500 ते 600 वर गेला आणि शहरातील पाहिलं मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय घोषित करण्यात आलं.

दरोरोज 10 ते 15 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

शहरात आता दिवसाला कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे.दरोरोज 200 ते 300 नवीन रुग्ण पुणे शहरात आढळून येत आहे.त्यातही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात दिवसाला फक्त 10 ते 15 पॉझिटीव्ह कोरोना रुग्णांची वाढ होत आहे.शहरातील सर्वात मोठी वस्ती असलेलं भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय लवकरच कोरोना मुक्त होईल अशी अपेक्षा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

मागच्याच आठवड्यात पुणे शहर कंटेन्मेंट झोन मुक्त

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पूणे आणि मुंबई शहरात झाला आहे. काही काळापूर्वी 100 च्या आसपास कंटेन्मेंट झोन असणार पुणे शहर मागच्याच आठवड्यात कंटेन्मेंट झोन मुक्त झाला आहे.आता पुणे शहरात एकही कंटेन्मेंट झोन नाही.

अजूनही त्या प्रवाशांचा शोध सुरू

25 नोव्हेंबरनंतर पुणे शहरात विदेशातून आलेल्या प्रवाश्यांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.ब्रिटन किंवा युरोपातील देशांमधून २५ नोव्हेबंरनंतर आलेल्यांचं पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, आणि पुणे ग्रामीण अशी क्षेत्रांप्रमाणे वेगवेगळी वर्गवारी करण्यात आली. ३०० जणांची यादी आपल्याकडे आहे. २७० जणांचे आरटीपीसीआरदेखील करण्यात आले आहेत. पण काही नावांचा खुलासा होत नाही आहे. महापालिकेने यासंबंधी पोलिसांकडे पत्र सोपवलं असून तक्रार दिली आहे,पण आजून ही या प्रवाश्यांचा शोध सुरु आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमधून पिस्तूल आणि जिवंत कातडतुसे बाळगणारा अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.