पुणे - देशभरात 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचा स्वीकार करून भारताला 71 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगभरातील संविधान बारकाईने वाचल्यानंतर त्यांचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो भारतीय संविधान सभेसमोर मांडला. याच दिवशी संविधानाने तो स्वीकारला आणि त्यानंतर 19 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाचा मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. संविधान दिनानिमित्त साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने खास बातचीत केली.
'संविधानाचा मूळ ढाचा कोणालाही बदलता येणार नाही'-
गेल्या अनेक वर्षांपासून संविधान बदलाची चर्चा सुरू असलेल्या मुद्यावर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस यांनी भाष्य केलं आहे. भारतीय संविधानाचा मूळ ढाचा हा भारताच्या आणि जगाच्या कुठल्याही व्यक्तीला आणि शक्तीला बदलता येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. संविधानाचा मूळ ढाचा बदलता येणार नाही पण काळानुसार काही दुरुस्त्या करता येऊ शकतात.70 वर्षात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या पण धर्मनिरपेक्षतेचा जो मूळ गाभा आहे.त्याला धक्का लावता आलेला नाही आणि भविष्यात देखील त्याला धक्का लावता येणार नाही.संविधान हे कोणत्याही धर्माच कुंकू किंवा टिळा लावत नाही. धर्माचा स्वतंत्र हा जनतेला आहे. संविधान कोणत्याही धर्माची बांधिलकी मानत नाही, असे यावेळी डॉ. सबनीस म्हणाले.
'सर्वधर्मीयांनी 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला पाहिजे' -
संविधानाच्या सक्षरतेसाठी आज 26 नोव्हेंबरला मागास वर्गीय समाज तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हे जास्त प्रमाणात संविधान दिन साजरा करतात.संविधान हे एका जातीचा नसून संविधान दिन हा प्रत्येक धर्मियांच्यावतीने साजरा केला गेला पाहिजे. वर्षभरात प्रत्येक क्षणी संविधान हे जगावल पाहिजे पण तस होत नाही. वर्षभर नव्हे पण किमान 26 नोव्हेंबरला तरी सर्वांनी एकत्र येत संविधान दिन साजरा केला पाहिजे, असे देखील यावेळी सबनीस म्हणाले.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वाची भूमिका'-
संविधान दिवस एक प्रकारे देशाचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्याचही प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटल्या जात. संविधानाच्या निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. खरंतर संविधानाच्या बाबतीत अस बरेच काही आहे जे आपल्याला माहीत हवं पण संविधानातील आणि संविधानाच्या संदर्भातील काही प्रमुख तथ्य जाणून घेऊया.
- भारताचे संविधान डिसेंबर 1946 ते डिसेंबर 1949 दरम्यान तयार करण्यात आल.हा काळ अतिशय आव्हानात्मक काळ होता.कारण धार्मिक दंगल जातिभेद आणि स्त्री-पुरुष असमानता देशाच्या सार्वभौमत्वाला धोक्यात टाकत होती.
- भारतीय राज्यघटना मूलभूत राजकीय तत्त्वे स्पष्ट करणारी चौकट आखून देते. तसरकारी संस्थांची रचना प्रक्रिया अधिकार आणि कर्तव्य निश्चित करते तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार निर्देशांची तत्वे आणि कर्तव्य ठरते.
- संविधान सभेने याचा मसुदा तयार केला होता.389 सदस्यांच्या संविधान सभेला स्वतंत्र भारताचे संविधान बनवण्याचा ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे 11 महिने आणि 17 दिवस लागले. यादरम्यान 165 दिवसांच्या अवधीचे 11 अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्राफ्टिंग समितीची स्थापना केली होती.
- हा मसुदा ना छापील होता ना टाईप केलेला होता हा मसुदा हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये चक्क हाताने लिहिण्यात आला होता.
- जेव्हा भारतीय संविधान अस्तित्वात आल्या तेव्हा देशात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
- आपल्या संविधानाला बॅग फॉर ब्रोविंग्स ही म्हटलं जातं कारण यामध्ये विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यांचा काही निवडक विचारांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा - 26/11 Attack : 13 वर्षांनंतरही अंगावर येतो काटा....वाचा 26/11 हल्यातील साक्षीदार देविका रोटवानीची खास मुलाखत